भुसावळ (प्रतिनिधी) मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मोठा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. १ ऑगस्टपासून ११ ऑगस्टपर्यंत हा मेगाब्लॉक राहणार आहे. या काळात अनेक अभियांत्रिकी काम केली जाणार आहेत. त्यामुळे हा विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकचा प्रवाशांना चांगलाच मनस्ताप होणार आहे. तसेच भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
मध्य रेल्वेच्या मार्गावर एक मोठा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान नागपूर- भुसावळ दरम्यान धावणाऱ्या तब्बल ११ गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या तारखांना या फेऱ्या रद्द असतील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. विभागात तांत्रिक कार्य करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जात आहे. दरम्यान, सेलू रोड स्थानक येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जात आहे.
सेलू रोड स्थानक येथे यार्ड रिमोडूलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यासाठी प्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कार्य यादरम्यान केले जाणार आहे. तसेच तिसरी मार्गिका आणि चौथी मार्गिका, वर्धा नागपुर दरम्यान लाँग हॉल लूप लाईनला कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात येत आहे. त्याचे कामही या विशेष ब्लॉक दरम्यान केले जाणार आहे. तसेच नागपुर- मुंबई एक्सप्रेस ५ ऑगस्टला नागपूर विभागात १.४५ तास नियमित केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आली. दरम्यान या मेगाब्लॉकचा सर्वाधिक फटका भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसणार आहे.
या एक्सप्रेस गाड्या होणार रद्द
या मेगा ब्लॉकमुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. यात अमरावती अजनी एक्सप्रेस १ ते ३, ५, ६, १० आणि ११ ऑगस्ट रोजी रद्द केली आहे. अजनी अमरावती एक्सप्रेस १ ते ३, ५, ६, १० आणि ११ ऑगस्ट रोजी रद्द असेल. तसेच अमरावती – जबलपूर एक्सप्रेस ४, ५, ९, १० ऑगस्ट रोजी रद्द आहे. जबलपूर – अमरावती एक्सप्रेस ५, ६, १० आणि ११ ऑगस्ट रोजी रद्द असेल. अजनी पुणे हमसफर एक्सप्रेस ६ ऑगस्ट, पुणे – अमरावती एक्सप्रेस ७ ऑगस्ट, पुणे-नागपुर हमसफर ८ ऑगस्ट, अमरावती – पुणे एक्सप्रेस ८ ऑगस्ट, नागपुर पुणे हमसफर एक्सप्रेस ९ ऑगस्ट, पुणे अजनी हमसफर एक्सप्रेस १० ऑगस्टला तर अजनी- पुणे हमसफर एक्सप्रेसची ११ ऑगस्टला फेरी रद्द करण्यात येणार आहे.