मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता शाहरुखच्या पठाणने (Pathaan) पहिल्याच दिवशी KGF: Chapter 2 आणि War चे रेकॉर्ड तोडले आहेत. थोडक्यात पठाण पहिल्याच दिवशी भरघोस कमाई करणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.
शाहरुख खान (Shahrukh khan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्या ‘पठाण’ चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीतही जबरदस्त कमाई करत सर्वच चित्रपटांना मागे टाकले आहे. यामुळे सगळीकडे फक्त पठाण, पठाण, पठाण अशीच चर्चा आहे. किंग खानने तब्बल 4 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुखचा पठाण रिलीज झाल्यानंतर चित्रपटगृहाबाहेर एकच जल्लोष सुरु होता.
पठाण बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडत आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते पठाणने पहिल्या दिवशी 54 कोटींची कमाई केली आहे. यासह शाहरुख खानचा आतापर्यंतचा सर्वात मोठा नॉन हॉलिडे ओपनर चित्रपट बनला आहे. पठाणने KGF: Chapter 2 चाही रेकॉर्ड मोडला आहे. रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली रिलीज झालेल्या ‘पठान’ ने ओपनिंग डेवर ५१ कोटी रुपयांची रेकॉर्ड कमाई करून बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस पाडला. ‘पठान’च्या दर्शकांनाच नाही तर चित्रपट समीक्षकांकडूनही जबरदस्त रिव्ह्यू मिळत आहेत. सोशल मीडियावर अनेक असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये प्रेक्षक सिनेमागृहामध्ये शिट्ट्या वाजवत आणि नाचताना दिसत आहेत.