TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

५० लाख द्या, नाहीतर उमेदवारी कापू !

खंडणीसाठी धमकावणारे दिल्लीतील दोन तोतया प्रधान सचिव पोलिसांच्या जाळ्यात !

vijay waghmare by vijay waghmare
October 26, 2024
in गुन्हे, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) पक्षाकडून दिली जाणारी उमेदवारी रद्द केली जाईल, अशी धमकी देत ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या दिल्लीतील दोघा तोतया प्रधान सचिवांना नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून भामट्यांनी शहरातील एका लोकप्रतिनिधीकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता.

शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने दिल्ली गाठून दोघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कर्नाटक निवडणूक काळात याच प्रकारच्या धमकीमुळे मोठी रक्कम पदरात पडल्याने संशयितांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवल्याचे तपासात पुढे आले आहे. संशयितांना न्यायालयाने सोमवार, २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सर्वेश मिश्रा ऊर्फ शिवा ऊर्फ दिनू सुरेंद्र मिश्रा (रा. प्रताप विहार खोडा कॉलनी, गाझियाबाद उत्तर प्रदेश) व गौरवनाथ बहादुरसिंग नाथ (रा. घडोली गाव, दिल्ली) अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

दिल्लीत महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दोघा भामट्यांनी कर्नाटक राज्यात झालेल्या निवडणूक काळात ठकबाजीचा हा फॉर्म्युला वापरला होता. बंगळुरू येथील लोकप्रतिनिधीला निवडणुकीत पक्षाचे तिकीट कापण्याची धमकी देत, संशयितांनी त्याला त्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम वर्ग करण्यास भाग पाडल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. ६ ऑक्टोबर रोजी नाशिक शहरातील एका लोकप्रतिनिधीला भामट्यांनी धमकी दिली होती. प्रमोद मिश्रा नावाने फोन करून, आपण ‘पीएमओ’ कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संबंधिताचे तिकीट कापल्याची बतावणी केली. लोकप्रतिनिधीचा विश्वास मिळवण्यासाठी भामट्यांनी आपल्या हातात त्याबाबतचे पत्र असल्याचे सांगत ते वाचूनही दाखवले.

आपले तिकीट वाचवायचे असल्यास उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी ५० लाख रुपये द्यावे लागतील; तसेच मागणी पूर्ण न केल्यास राज्यात बदनामी करण्यात येईल, अशी थेट धमकी यावेळी भामट्यांनी दिली. अचानक बसलेल्या धक्क्यातून सावरलेल्या लोकप्रतिनिधीने जिल्ह्यातील आपल्या पक्षातील काही लोकप्रतिनिधींशी संपर्क साधल्याने भामट्यांचा हा डाव फसला. नाशिकसह अन्य ठिकाणच्या लोकप्रतिनिधींशी झालेल्या संपर्कातून पक्षाच्या नावाने कुणी तरी खंडणी उकळत असल्याचे पुढे आल्याने संबंधित लोकप्रतिनिधीने पोलिसांत धाव घेतली होती. याबाबत शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेची दखल घेत आयुक्त संदीप कर्णिक यांनी ठकबाजांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश जारी केले होते. शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने दिल्ली गाठून संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयित नाशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकताच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यांना ताब्यात घेतले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Nashikotherwise the candidacy will be cut off!Pay 50 lakhs

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

क्षणात झालं होत्याचं नव्हतं...धरणगावात १९ वर्षीय तरुणीचा हिटरचा शॉक लागून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावे’ – राऊतांची टीका

November 7, 2020

जळगावातील सर्व कार्यक्रम रद्द करत खडसे तातडीने मुंबईला रवाना

June 23, 2022

शेतकरी आंदोलन : झी, टाइम्स नाऊचे वार्तांकन चुकीचे !

November 24, 2021

जळगावात ख्रिसमस सजावटीवरुन तोडफोड ; सांताक्लॉजचे पोस्टर फेकले रस्त्यावर !

December 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group