मुंबई (वृत्तसंस्था) येथील नरिमन पॉईंट येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या सहकार क्षेत्रातील नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक महाराष्ट्र प्रदेश सहकार आघाडीचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकपार पडली. या बैठकीत विविध कार्यकारी सोसायट्यांचे सशक्तीकरणासह सोसायटींचे पुनर्वसन करण्याबाबत चर्चा झाली.
या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप सहकार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्य मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित निकम, आमदार प्रसाद लाड, सांगलीचे सत्यजित देशमुख, नाफेडचे संचालक केदार आहेर, धाराशिवसे दत्ता कुलकर्णी आदी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख सहकार क्षेत्रातील भाजपचे नेते उपस्थित होते.
सहकार सशक्तीकरणासाठी विशेष लक्ष देण्यात यावे – भूपेंद्र यादव !
सहकार प्रशक्तीकरणासाठी विशेष लक्ष देण्यात यावे अशा सूचना केंद्रीय मंत्री उपेंद्र यादव यांनी दिल्या तसेच महाराष्ट्र राज्यात सहकाराचे गावा गावात जाळे विणले गेले असून शेतकरी केंद्रबिंदू मानून काम झाले पाहिजे, अशाही सूचना उपेंद्र यादव यांनी दिल्या.
शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळावे : रोहित निकम
या बैठकीत प्रामुख्याने विविध कार्यकारी सोसायट्यांचे सशक्तिकरण तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत जास्तीत जास्त व्यवसाय ग्रामीण भागात कसा पोहोचवता येईल, अवसायनात गेलेल्या सोसायट्यांचे पुनर्वसन आणि शेतकऱ्यांसाठी शेती कर्ज अजून कसे सुलभ करता येईल यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निर्देशनाने यावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. तसेच अवसायनात गेलेल्या विकास सोसायटीच्या कर्ज वाटपाचा मुद्दा रोहित निकम यांनी मांडला. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळावे याबाबतचे निवेदन देखील रोहित निकम यांनी दिले.