पुणे (वृत्तसंस्था) निवृत्तीनंतर सुखाने आयुष्य जगता यावे यासाठी गुंतवणूक किंवा बचत (Investment or savings) करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आपल्यालाही निवृत्तीच्या वेळी पेन्शन (Pension) मिळवायचे असेल, तर या सरकारी योजनेत (Government scheme) पैसे जमा करून तुम्हाला दरमहा चांगली रक्कम मिळू शकते. या योजनेअंतर्गत पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळू शकतो. या अंतर्गत नोकरी नसलेल्यांना पेन्शन मिळू शकते.
अशी आहे योजना
केंद्र सरकारकडून वृद्धापकाळासाठी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. सदर पेन्शन योजना ही पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणद्वारे प्रशासित केली जाते. १८ ते ४० वर्षे वयोगटातील प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. यामध्ये गुंतवणूक करण्याचा दुसरा निकष म्हणजे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे. कोणताही भारतीय कामगार किंवा नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
योजनेचे फायदे
याचा लाभ घेण्यासाठी वयाच्या ६० वर्षापर्यंत नियमितपणे प्रीमियम भरावा लागेल. त्यानंतर मासिक पेन्शनची ठराविक रक्कम सुरू होईल. ते कार्यकाळानुसार रु. १ ते ५ हजार रुपयां दरम्यान पेन्शन प्रदान करते. या मधील गुंतवणुकीला आयकर कायदा अंतर्गत देखील कर सूट देण्यात आली आहे. म्हणजेच या योजनेंतर्गत २ लाख रुपयांपर्यंत करात सूट दिली जाते.
या सरकारी योजनेत दरमहा २१० रुपये जमा केल्यास पती-पत्नी दोघांना १० हजार पेन्शन मिळेल, जेव्हा या योजनेअंतर्गत पेन्शनचा विचार केला जाईल, तेव्हा दैनंदिन खर्च चालवण्यासाठी तुमच्या खात्यात रक्कम मिळू लागेल. या पेन्शन योजनेचा ज्यांना निवृत्तीच्या काळात किंवा वृद्धापकाळात खर्च भागवता येत नाही, त्यांना या योजनेचा लाभ घेता येत आहे.