जळगाव (प्रतिनिधी) डाक विभागातर्फे सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयी तक्रारी समजुन घेण्यासाठी येत्या २५ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी ४ वाजता पेन्शन अदालतीचे आयेाजन डाक अधिक्षक, जळगाव विभाग यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल. अशा तक्रारींची या पेन्शन अदालतमध्ये दाखल घेतली जाईल. यामध्ये टपाल विभागतून निवृत्त झालेल्या अथवा सेवेत असतांना मृत्यू झालेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचा विचार करण्यात येईल. पेन्शन अदालत मध्ये वैयक्तिक कायदेशीर प्रकरणे तसेच नीती आधारित सूचना/तक्रारी यांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे पोस्टमास्तर जनरल, जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.