जळगाव (प्रतिनिधी) लग्नाआधीच हुंड्याचे दागिने व पैशांसाठी होणारा छळ, तसेच होणाऱ्या पतीनेच जाड म्हणून हिणवले व लग्न मोडण्याची धमकी दिल्यामुळे उच्चशिक्षित तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रामेश्वरी रवींद्र नागपुरे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, रामेश्वरी हिचे भूषण ज्ञानेश्वर पाटील ऊर्फ बारी याच्याशी लग्न ठरले होते. ६ मार्च रोजी साखरपुडा झाला होता, तर १८ मे रोजी विवाह होणार होता. परंतु साखरपुडा होताच काही दिवसांनी भूषण व त्याच्या आईकडून दागिने, पैशांचा तगादा सुरू झाला. त्यानुसार दागिने व रोख रक्कम दिली. त्यानंतर पुन्हा भूषणकडून हिणवणे सुरू झाल्याने रामेश्वरी रवींद्र नागपुरे हिने घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.