नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कुख्यात गुन्हेगाराचे टपाल तिकीट छापण्याचा कारनामा उत्तर प्रदेशात घडलाय. कुख्यात गुंड छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी यांचे मुद्रांक भारतीय पोस्टल विभागाच्या ‘माय स्टॅम्प’ योजनेंतर्गत छापण्यात आले. हे टपाल तिकीट पाच रुपयांचे असून १२ टपाल तिकीट छोटा राजन आणि १२ मुन्ना बजरंगीचे आहेत.
तिकिटांची छपाईसाठी टपाल खात्याला यासाठी ६०० रुपये फी दिली गेली. तिकिटांची छपाई करण्यापूर्वी ना छायाचित्रांची तपासणी केली गेली की, ना प्रमाणपत्र मागितले गेले. साहजिकच अशी तिकीट तर छापता येत नाही, परंतु जर सिस्टममध्ये एखादी त्रुटी असेल तर गुन्हेगाराचे सुद्धा टपाल तिकीट छापता येऊ शकते. कानपूरमध्ये नेमकं हेच घडले आहे. इथे मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये आंतरराष्ट्रीय माफिया छोटा राजन आणि बागपत कारागृहात झालेल्या चकमकीत मारला गेलेला कुख्यात गुंड मुन्ना बजरंगी हे टपाल तिकिटे बनले आहेत. या तिकिटांच्या माध्यमातून देशात कुठेही पत्रे पाठविली जाऊ शकतात. छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी यांचे मुद्रांक भारतीय पोस्टल विभागाच्या ‘माय स्टॅम्प’ योजनेंतर्गत छापण्यात आले. हे टपाल अशा परिस्थितीत हिंसा करणाऱ्या गुन्हेगारांचाच काय तर दहशतवाद्यांचा शिक्काही छापला जाऊ शकतो, हेच यावरुन दिसून येत आहे. परंतु यापैकी कोणतीही प्रक्रिया टपाल खात्याने पाळली नाही. या संदर्भात आता चौकशीचे आदेश टपाल खात्याने दिले आहेत.