जळगाव (प्रतिनिधी) व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी जळगाव येथील विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील सोनवद येथील सात जणांवर तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील आव्हाणे शिवारातील रेणूका नगरातील माहेर असलेल्या दिपाली जितेंद्र पांडे (वय-३२) यांचा विवाह धरणगाव तालुक्यातील सोनवद येथील जितेंद्र भगीरथ पांडे यांच्याशी २००९ मध्ये झाला. त्यानंतर लग्न झाल्यापासून वेळोवळी पती यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी विवाहितेने माहेरहून २ लाख रूपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. दरम्यान, दोन्ही कुटुंबियांची मध्यस्थी होवून वाट मिटविण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
परंतु, सासरे भगिरथ पन्नालाल पांडे, सासू लिलाबाई भगीरथ पांडे, जेठ मयूर भगिरथ पांडे, जेठानी मनिषा मयुर पांडे, जेठ नितीन भगीरथ पांडे, जेठाणी वंदना नितीन पांडे सर्व रा. सोनवद ता. धरणगाव यांनी विवाहितेस सतत टोमणे मारत शिवीगाळ करणे सुरूच होते.
हा सकाळ प्रकार असहाय्य झाल्याने विवाहिते जळगाव येथील माहेरी निघून आल्यात. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्थानकात पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ सतीष हारनोळ करीत आहे.