जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठी प्रतिष्ठान व पिंप्राळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पिंप्राळा परिसरातील खुल्या जागेत वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.
महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे गुलाबराव वाघ, गजानन मालपुरे, राष्ट्रवादीचे योगेश देसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर अध्यक्ष किरण पाटील, संभाजी ब्रिगेडचे तुषार सावंत, मयूर चौधरी, जितेंद्र पाटील, राहुल शिंदे, दीपक पवार, प्रफुल पाटील, ललित शर्मा, दीपक राठोड यांच्यासह मान्यवर व पिंप्राळा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी वृक्ष संगोपनाची शपथ मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे यांनी उपस्थित नागरिकांना व वृक्षप्रेमींना दिली. पिंपळ, वड,काशीद, करंज, लिंब, फापडा,शिसम अशा देशी वृक्षांचं वृक्षरोपण परिसरात करण्यात आले.
दरम्यान, येत्या पंधरा दिवसात मराठी प्रतिष्ठान व पिंप्राळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्याने पिंप्राळा परिसरामध्ये एक हजार वृक्षांचं वाटप लवकरच करण्यात येणार असून एक घर एक वृक्ष असे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे व पिंप्राळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.