धरणगाव (प्रतिनिधी) जय बजरंग व्यायाम शाळा तर्फे भव्य प्लास्टिक (विक्की) बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. महंत भगवान बाबा महाराज (माऊली वारकरी शिक्षण संस्था) यांच्या मठाच्या मागे सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत ३० संघांनी सहभाग नोंदवला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, क्रिकेट स्पर्धांचे आयोजन झाल्याने क्रिकेट खेळाडू व क्रिकेट प्रेमींसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भाजपा गटनेते कैलास माळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश भागवत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब सुभाष पाटील, विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, विकल्प ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष अमोल सखाराम महाजन, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सदस्य निलेश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. सर्वप्रथम कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर आयोजकांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. प्रमुख अतिथींच्या हस्ते चेंडू – फळीचे पूजन करून क्रिकेट स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना देखील क्रिकेटचा मोह आवरता आला नाही. अतिथी मान्यवरांनी आपल्या गोलंदाजी व फलंदाजीचे कौशल्य दाखवत सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवला.
भव्य प्लास्टिक (विक्की) बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भाजपा गटनेते कैलास माळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश भागवत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब सुभाष पाटील, विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, मराठा टेंट चे संचालक जगदीश मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेच्या आयोजनात जय बजरंग व्यायाम शाळा, हनुमान नगर धरणगाव व रामराज्य ग्रुप यांचे अध्यक्ष समाधान वाघ यांच्यासह अमोल सखाराम महाजन, जगन प्रल्हाद महाजन, राहुल सुरेश महाजन, महेश मराठे, कृष्णा राजपूत, गजानन सोमनाथ महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे आयोजन रावसाहेब पाटील, विजय महाजन, निलेश महाजन, केतन मराठे यांनी केले. औपचारिक उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा कॉम्पुटर चे संचालक योगेश महाजन यांनी केले.