TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शहरात डांबरी रस्ते करताना प्लास्टिकचा उपयोग होणार ; फिस्ट फाऊंडेशन, इनरव्हील क्लबचे निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरात नवीन रस्ते तयार करण्याची कामे गेल्या अनेक वर्षापासून झालेली नव्हती. त्यातच अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची पार वाट लागली. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अपघातात काहींना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे दुखणे जडले. जळगाव शहरात नुकतेच रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली ही जळगावकरांसाठी चांगली बाब आहे. शहरातील रस्ते तयार करताना डांबरसोबत प्लास्टिकचा देखील उपयोग करावा, अशी मागणी फिस्ट फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना करण्यात आली. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्यांसाठी पुढील निविदा प्रक्रिया राबविताना त्यात प्लास्टिक वापराची अट नमूद करण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या.

जळगाव शहरात डांबरी रस्ते करताना ते गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ होण्यासाठी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार डांबरसोबत प्लास्टिक बिटूमीन्स देखील त्यात वापरावे, अशी मागणी करण्यासाठी मंगळवारी फिस्ट फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची भेट घेतली. प्रसंगी फिस्ट फाऊंडेशनचे सकिना लहरी, चेतन वाणी, कल्पक सांखला, लक्ष्मी सांखला, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा नेहा संघवी, इशिता दोशी, नफिसा लहरी आदी उपस्थित होते.

READ ALSO

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

फिस्ट फाऊंडेशनतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात, शहरातील रस्त्यांचे काम करताना ते गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी मक्तेदारावर जबाबदारी करणारे एक परिपत्रक काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे. शहरात आता नव्याने तयार केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाला ते लागू करण्यात यावे. रस्ते किमान पुढील १० वर्ष टिकावे यासाठी आताच कामाच्या निविदेत आवश्यक तो बदल करावा, रस्त्यांची कामे पूर्ण होण्यापूर्वी त्याठिकाणी पाईपलाईन दुरुस्ती, ड्रेनेज, इतर केबल संदर्भातील कामे पूर्ण झालेली आहेत की नाही याची खात्री मनपा प्रशासनाकडून करवून घेण्यात यावी, जेणेकरून भविष्यात पुन्हा रस्ता खोदकाम करण्याची आवश्यकता भासणार नाही. जळगाव शहर विकासाच्या टप्प्यावर येऊन ठेपले असून शहरात प्रायोगिक तत्वावर एक रस्ता प्लास्टिक वेस्टचा उपयोग करून तयार करावा, अशी मागणी करण्यात आली.

मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड म्हणाल्या, उदगीर येथे असताना त्यांना प्लास्टिक वेस्टपासून रस्ता तयार करण्याचा उपक्रम राबविला होता. जळगावात देखील असा उपक्रम राबवता येऊ शकतो. पर्यावरण संवर्धनासाठी जळगाव मनपा प्रयत्नशील असून अनेक उपक्रम विविध संस्थांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे. जळगावात डांबरी रस्त्यांच्या नवीन कामांची निविदा प्रक्रिया राबविताना त्यात प्लास्टिकचा उपयोग करण्याचे नमूद करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी अभियंत्यांना दिल्या. फिस्ट फाऊंडेशनच्या सदस्यांशी पुन्हा भेटत चर्चा करण्याचे देखील मनपा आयुक्त म्हणाल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
जळगाव

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 7, 2026
जळगाव

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

April 7, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
जळगाव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निवारणाला गती

April 7, 2026
Next Post

इक़रा शाळेतील ४ विद्यार्थ्यांना शाळेतून काढल्याप्रकरणी विद्यार्थी पालक व मनियार बिरादरीचे जिल्हादंडाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना साकड़े

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : ‘या’ मतदार संघातील उमेदवाराचा शामकांत सोनवणे यांना जाहीर पाठिंबा

November 9, 2021

जळगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर जागा भरणार ; 20 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !

July 4, 2023

केरळमध्ये पावसाचा हाहाकार ; १८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता !

October 17, 2021

अमळनेर नगरपरिषद विविध समिती सभापतींची बिनविरोध निवड

January 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group