औरंगाबाद (वृत्तसंस्था) हात धुवायला गेलेल्या 4 वर्षीय चिमुकली हीटर लावलेल्या बादलीत पडून भाजल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबामध्ये घडली आहे. श्रेया राजेश शिंदे (4, रा.साईनगर, कमळापूर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
श्रेयाचे वडील राजेश शिंदे हे दुपारच्या सुमारास घरी आले. अंघोळीसाठी बादलीमध्ये पाणी ठेवले होते. यादरम्यान 4 वर्षीय श्रेयाने आपल्या वडिला थोडी खेळली सोबत जेवण केले. यानंतर आईने लावलेल्या गरम पाण्याजवळील नळावर श्रेया हात धुण्यासाठी गेली. यावेळी तिचा तोल हीटर लावलेल्या बादलीमध्ये गेला. यामध्ये ती गंभीररित्या भाजली. वडिलांनी हीटरचे बटन बंद करून श्रेयाला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र गंभीर गंभीरपणे भाजलेल्या श्रेयाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयस्पर्शी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजेश शिंदे हे पत्नी सीमा, मुलगा साई (७), मुलगी श्रेया (४), आई-वडिलांसह कमळापूर येथे साईनगरात वास्तव्यास आहेत.