नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मोदींना चहा विकणारा नाही तर चहा विकणाऱ्याचा मुलगा म्हणवल गेल पाहिजे . ही पत्रकरांची चूक आहे. आमच्या वडिलांनी पूर्ण आयुष्य चहा विकून आमच्या 5 भाऊ आणि बहिणींचे पालनपोषण केलं. आपल्या इकडचे पत्रकार लिहतात चहावाला, मोदींना चहावाल्याचा मुलगा म्हणा चहावाला नाही, अशी सडकून टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सख्हे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी केली आहे. ते जंतर मंतरवरील आंदोलनात बोलत होते.
अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या फेडरेशनच्यावतीनं आयोजित नवी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी सहभाग घेतला. प्रल्हाद मोदी हे अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. नवी दिल्लीत जंतरमतर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी आपल्या भावावरच सडकून टीका केली आहे. भाषणात त्यांनी मोदींच्या चहा विकण्यावरती आक्षेप घेतला आहे. बोलताना ते म्हणाले की, मोदींना चहा विकणारा नाही तर चहा विकणाऱ्याचा मुलगा म्हणवल गेल पाहिजे . ही पत्रकरांची चूक आहे. आमच्या वडिलांनी पूर्ण आयुष्य चहा विकून आमच 5 भाऊ आणि बहिणीच पालनपोषण केलं. आपल्या इकडचे प्रेसवाले लिहतात चहावाला, मोदींना चहावाल्याचा मुलगा म्हणा चहावाला नाही”. या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
प्रल्हाद मोदी आणि अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदार फेडरेशनच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या जंतरमंतर येथील आंदोलनात सहभागी झाले होते. फेडरेशनच्या मागण्यांचं निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं जाणार आहे. प्रल्हाद मोदी हे देखील एक रेशन दुकान चालवतात. माझा भाऊ पंतप्रधान असला म्हणून काय झालं, उपाशी मरु का? असा सवालही त्यांनी या आधी केला होता.