धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रभाग ६ पारधी वाडा, अंगणवाडी येथे निमोनिया लसीकरणाचा शुभारंभ धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी व प्र ६ चे नगरसेविका संगिता गुलाब मराठे यांच्या हस्ते करण्यात आला.
न्युमोकोकेल वँक्सिन लहान बालकांना निमोनिया पासुन संरक्षण करते. या लसीविषयी उपस्थितांना डॉ. गिरीश चौधरी यांनी मार्गदर्शन केले. नगरसेविका संगिता मराठे यांनी परीसरातील सर्व मातांनी बालकाना लसीकरण करावे, असे सांगितले तसेच अंगणवाडी कडुन बालकांसाठी आरोग्य विषयी विविध उपक्रम राबविले जातात.
या कार्यक्रमास आरोग्य सेवक एल के पवार तसेच किरण विसपुते (नर्स) तसेच अंगणवाडी सेविका माया पवार, वंदना कंखरे, अनिता कंखरे यांनी परीश्रम घेतले.