जळगाव (1 जानेवारी 2025) ः जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार, 31 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता खाजगी वाहनांमध्ये भरणार्या चार जणांवर कारवाई करीत दोन लाख एक हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दुपारी दोन वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमकी कारवाई ?
जळगाव शहरातील पिंप्राळा वखारजवळ घरगुती गॅसचा काळाबाजार करून खाजगी वाहनामध्ये अवैधपणे भरत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी 31 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता चार ठिकाणी छापा टाकला. यात कारवाईत संशयित आरोपी वसीम चंगा शहा (27), अखलाख खान जहांगिर खान (29), फिरोज अलाउद्दीन शेख (22) आणि जुबेरखान उस्मानखान पठाण (32, सर्व रा.पिंप्राळा, जळगाव) या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून घरगुती गॅसचे 11 सिलेंडर तसेच गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण 2 लाख 1 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी 2 वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे करीत आहे.