भडगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात तपासासाठी पोलीस पथक गावात संशयिताला घेवून आल्यानंतर आरोपीला आमच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती. याप्रकरणी भडगाव पोलिसात 16 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भडगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील नराधम आरोपी स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (19, भडगाव तालुका) यास तपासार्थ गुरुवारी सायंकाळी स्पॉट पंचनाम्यासाठी आणल्यानंतर संतप्त जमावाने आरोपीवर दगडफेक केली. या घटनेत पोलीस वाहनाच्या काचा फुटल्या होत्या तर तीन पोलीस जखमी झाले होते. या घटनेत हवालदार नितीन तुकाराम रावते, हवालदार विलास बाबूराव पाटील व नाईक दिलीप संतोप पाटील जखमी झाले होते.