बोदवड (प्रतिनिधी) बोदवड शहरात राजकारण तापले असून सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाची फैरी सूरू झाल्याचे आजच्या पत्रकार परिषदेतून दिसून आले. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी राष्ट्रवादीतर्फे केलेले साखळी उपोषणाव्दारे शहराच्या विकास रोखण्यासाठी सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केले होते. त्यांच्या आरोपांचे खंडण करण्यासाठी सत्ताधारी गटाचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदमध्ये विविधि सामाजीक व शहराच्या विकासासंदर्भातील विषयांना विरोधीपक्षाने नेहमी विरोध केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी विरोधी नगरसेवकांवर केला होता.
सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आरोपाचे खंडण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी आज शासकिय विश्रामगृहावर सत्ताधारी गटाचा निषेधार्थ काळ्या फिती दंडावर बांधून पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आरोपांना कागदपत्रे दाखवत खोडून लावले. व कशाप्रकारे सत्ताधरी शहराचा विकास करण्यास असमर्थ ठरत आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांतर्फे करण्यात आला. तसेच सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी मिळून मागील इतिवृत्त नगरपंचायत आवारात सूटटीच्या दिवशी जाळले असल्याचा आरोपही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला .
सत्ताधाऱ्यांनी लावलेले आरोप विरोधकांनी पुराव्यासकट खोडले ; ठरावाच्या नकलाच पत्रकार परिषदेत केल्या सादर !
१. ग्रामदैवत रेणूका देवी मंदीर सुशोभीकरणेसंदर्भात विरोधक नगरसेवकांनी विरोध केल्याचा आरोप सत्ताधारी गटातर्फे करण्यात आला होता त्यावेळी या आरोपाचे खंडण करत राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी ग्रामदैवत रेणूका देवी मंदीराच्या कामाची प्रशासकिय मान्यता १२/६/२०२१ ला जिल्हाधिकारीकडून मिळाली. त्यामध्ये प्रभाग १२,०९ व प्र.०६ अशी तीन कामे होती. त्या तिन्ही कामाची टेंडर प्रक्रीया पूर्ण झालेली आहे. परंतू प्र ६ चे राष्ट्रवादीचे तेव्हाचे नगरसेवक दिपकभाऊ झांबड हे असल्याने उर्वरीत दोन्ही कांमाच्या निवीदा उघडल्या गेल्या व त्याची कामे ही पुर्ण झाली परंतू प्र. क्र. ६ ची निवीदा उघडलीच गेली नाही. सत्ताधाऱ्यांनी त्यावेळी मंदीराच्या कामातही भेदभाव केला. सदर कामाची निवीदा प्रक्रीया पुर्ण झालेली असल्याने नवीन कामाला आम्ही स्पॉट व्हेरीफिकेशन ची मांगणी केली. असे सांगीतले.
२. स्मशान भूमीजवळ रस्ता कॉंक्रेटीकरण करणेसाठी विरोधी नगरसेवकांनी विरोध केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी लावला असता त्याचे खंडण करताना सदर काम बूडीत क्षेत्रात येत असल्याने त्या जागेवर स्पॉट व्हेरीफिकेशन करून कामास मान्यता दयावी जेणेकरून शासनाच्या निधीचा दूरूपयोग होणार नाही परंतू आजपर्यंतही सत्ताधाऱ्यांनी स्पॉट व्हेरीफिकेशन केलेले नाही ते न करण्यामागे एकमेव उददेश असा आहे कि सदर काम प्रशासकिय स्तरावर नामंजूर होईल.
३. डॉ. बाबासाहेब अंबेडकर स्मारक परीसरातील सुशोभिकरण करणेसाठी विरोधक नगरसेवकांनी विरोध केला असा सत्ताधाऱ्यांनी दावा केला या आरोपाचे खंडण करतांना मा. आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पुतळा समितीच्या लोकांना शब्द दिला होता कि सदर काम ८ दिवसात सूरू करण्यात येईल. त्याप्रमाणे पूतळयाच्या मागच्या साईडला बॅरीकेटींग करून कामही सूरवात केले होते परंतू आर.पी.आय चे जिल्हाध्यक्षांनी नगरपंचायत गाठून सदर कामाबाबत विचारणा केली व कागदपत्र मांगीतले तशे कोणत्याच प्रकारचे कागदपत्र नगरपंचात कार्यालयात उपलब्ध नसल्याने जोपर्यंत तूम्ही नियमानुसार काम करत नाही तोपर्यत काम सूरू करू नये अशी ताकीद दिली व तश्या सुचना बोदवडच्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिल्या त्यामूळे काम थांबले.जर सत्ताधाऱ्यांनी आमच्या दि. ११/०४/२०२२ च्या स्पॉट व्हेरीफिकेशनच्या पत्राचा विचार दोन वर्षा अगोदरच केला असता तर सत्ताधाऱ्यांना काम बंद करण्याची नामुष्की झाली नसती. व या दोन वर्षात त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता झाली असती. आमच्या त्याच मांगणीचा सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषदेत आम्ही विरोध केला अशी दिशाभूल करणारी माहिती दिली. दूसरी गोष्ट् १४/०२/२०२३ च्या सर्वसाधारण सभेत विषय क्र. ६४ नूसार बोदवड नगरपंचायत हददीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूतळयाचे सुशोभिकरण साठी नाहरकत दाखला व काम करण्याबाबत आम्ही मंजूरी दिलेली आहे.
४. म्हसोबा मंदीर सभामंडप बांधकाम करणेसाठी विरोधक नगरसेवकांनी विरोध केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले होते त्यावर सदर कामाला आम्ही २१/१२/२०२३ रोजी सर्वसाधारण सभेत विषय क्र. ४५ प्रमाणे मंजूर केलेला आहे. आणि सदर मिटींगमध्ये सत्ताधारी अनुपस्थित असल्याने त्या सभेत आमचे बहूमत होते हे विशेष असल्याचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सांगीतले.
५. म्हसोबा मंदीर समोरील मॉडर्न शौचालय बांधकामासाठी विरोधक नगरसेवकांनी विरोध केल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवकांनी केला असता त्यावर सदर ठिकाणी रहीवास असल्याने स्पॉट व्हेरीफिकेशन करणे संयूक्तिक होते तसे पत्र आम्ही त्या सभेत दिलेले आहे. असे विरोधी नगरसेवकांनी सांगीतले.
६. संतोषीमाता मंदीर समोरील गटर बांधकामाला विरोध केल्याच्या आरोपाचे खंडण करताना हा विषय आमचेच नगरसेविका यांच्या वॉर्डातील असून सुध्दा सदर कामाला भविष्यात अडचण येवू नये म्हणून स्पॉट व्हेरीफिकेशनची मांगणी केली. असल्याचे सांगीतले.
७. नळाच्या तोटया संदर्भात अरोप केले असता या विषयात स्पॉट व्हेरीफिकेशनचा कूठलाच संबध नसून आम्ही याला विरोध केलेलाच नाही.
८. गट नं. ५८४ गट विकसित करणे संदर्भात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर लावलेल्या अरोपाचे खंडण करतांना खासदार निधिअंतर्गत कामे झालेली आहे. त्यामूळे स्पॉट व्हेरीफिकेशन ची आमची मांगणी असल्याने आमचा विरोध कामाला नसून स्पॉट व्हेरीफिकेशन करून कामे करा अशी आमची मांगणी असल्याचे सांगीतले.
९. गट नं. ११४ मधील ७८२ चौ. मी. ओपन स्पेस सूशोभिकरण (भोई समाज सभामंडपाला विरोध केल्याचे आरोपाचे खंडण करतांना भोईसमाजाची सत्ताधाऱ्यांनी दिशाभूल केलेली आहे. सदर ठरावामध्ये भोई समाजाचा कोणताही उल्लेख नाही. आणि विशेष सदर जागेसंदर्भांत नगरपंचायतकडे ओपन स्पेस ची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
१०. गट नं. १३/१ खुल्या भूखंडावर वॉल कंपाऊंड करणे म्हणजेच वाणी समाज श्मशान भूमी ला विरोध केल्याचे आरोपाचे खंडण करतांना बोदवड नगरपंचायत हददीतील गट नं. १३/ १ हि जागा नगरपंचायतीच्या प्रशासकिय इमारतीसाठी व विविध उपयूक्त कामासाठी बोदवड नगरपंचायतीकडे हस्तांतरीत करून मिळणेबाबत विनंती केली आहे. सदरचा ठराव १४/२/२०२३ विषय क्र. ६५ नूसार नगरपंचायत इमारत व शॉपिंग कॉम्प्लेंस साठी मंजूर झालेला आहे मुख्याधिकारी यांचा २३/१/२०२३ रोजी चा पत्र जा. क्र.बोनपं. बांध/११५/२०२२-२३ या पत्राव्दारे नगरपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यासाठी जिल्हाधिकारीयांच्या कडे मांगणी केली आहे. असे असतांना त्या जागेवर वॉल कंपाऊंड साठी निधी कसा वितरीत करण्यात येईल? म्हणून सदर विषयात सत्ताधाऱ्यांनी वाणी समाजाची दिशाभूल केलेली आहे.
११. प्र..क्र.५ मधील संताजी नगर अन्नाभाऊ साठे नगर, हनुमान नगर प्रवेशव्दार बांधकाम करणे संदर्भात विरोधकांनी विरोध केल्याचा आरोपाचे खंडण करतांना सदर प्रवेशव्दार बनविण्यासाठी स्पॉट व्हेरीफिकेशनची आमची मांगणी चुकिची कशी? असा पश्न उपस्थित केला.
१२. प्र..क्र. १ मधील गट नं. १२२ (एकलव्य नगरमध्ये) खूल्याजागेवर वॉलकंपाऊंड सुशोभिकरण करणे करण्याला विरोधकांनी विरोध केल्याच्या आरोपाचे खंडण करतांना सदर ठराव दि. १७/०८/२०२२ च्या सर्वसाधारण सभेत विषय क्र. २४ प्रमाणे विषय मंजूर झालेला आहे. म्हणून त्यांनी आमच्यावर जो आदीवासी समाजाला विरोध केला असा आरोप केला त्या आरोपाला काहीच तथ्य नाही. हे या मंजूरीवरून सिध्द होते. आणि त्यांनी जो विषय सांगीतला त्या खुल्या जागेत स्पॉट व्हेरीफिकेशन करणे काय चुकिचे आहे ? असे सांगून सत्ताधाऱ्यांनी विरोधक नगरसेवकांवर केलेले आरोप हे बिनबूडाचे असल्याचे गटनेते व सर्व राष्ट्रवादीच्या नगरसेकांनी सांगीतले.
सत्ताधरी- विरोधक वाद विकोपाला ; विरोधकांनी केले सत्ताधाऱ्यांवर आरोप !
१. घनकचरा ठेका साधारणतः आठ लाख रुपये प्रति महिना बोदवडच्या घर संख्येनुसार असावा पण सत्ताधाऱ्यांनी तो बारा लाख रुपये प्रति महिना कसा केला? यात ४८ लाख रुपये केवळ ठेकेदाराचे भले करण्यासाठीच वाढवले गेले का?
असा प्रश्न उपस्थित केला.
२. बोदवड नगरपंचायत ला फिरते शौचालयाची आवश्यकता नसताना एक नव्हे ३ फिरते शौचालय खरेदी करण्यात आले हा केवळ भ्रष्टाचार आहे कारण फिरते शौचालयाची किंमत मार्केट प्राइस नुसार दुप्पट किमतीने कसे खरेदी करण्यात आल्या हा पैसा दुसरीकडे का वापरण्यात आला नाही याचे उत्तर नागरिकांना मिळाले पाहिजे.
३. अग्निशमन गाडी मार्केट प्राइस पेक्षा दुप्पट किमतीने का खरेदी करण्यात आली? सदर गाडी खरेदी करण्यामागे कोणाचा आशीर्वाद आहे. सध्या ती गाडी खाजगी हातात कशी आहे त्या गाडीच्या सुरक्षितेची जबाबदारी कोणाची?
४. कोणतेही आवश्यकता नसताना दोन घंटा गाड्या मार्केट प्राइस पेक्षा डबल किमतीने खरेदी करण्यात आल्या त्या वर्षभरापासून धूळ खात नगरपंचायत समोर पडलेले आहेत सत्ताधारी याचे उत्तर देतील का?
५. मा.आमदार एकनाथ खडसे यांनी अल्पसंख्याक समाजासाठी एक कोटी रुपये निधी दिला होता सदर निधी आमदार साहेबांनी दुसरीकडे वळविला त्यात वीस लाख रुपये मुक्ताईनगर कडे वळविले उरलेले ८० लाख मध्ये दोन वेळेस शुद्धिपत्रक वेगवेगळ्या कामासाठी का काढण्यात आले?
६. मा.आमदार खडसे यांनी दिलेल्या निधी मध्ये आपण वारंवार राजकारण आणण्याचा उद्देश काय?
७. आमदार खडसे यांनी पटवे समाजाला जो निधी दिला तो निधी स्थायी समितीमध्ये मंजूर का केला जात नाही त्यामागे कोणाचे निर्देश आहेत? तसेच खाटीक समाज साठी चा निधी , महादेव मंदिर , हनुमान मंदिर च्या खुल्या जागेच्या कामाला स्थायी सभेत विषय का घेण्यात आले नाही त्यासाठी उपोषण करावे लागणे हे दुर्दैव नाही का? कोणाच्या सांगण्यावरून हे होत आहे याचा खुलासा करावा.
८. आमदार खडसे यांनी २ वर्षात आमदार निधीतून साधारणत सव्वा कोटी बोदवडला दिले परंतु विद्यमान आमदार यांनी ४.५ वर्षात केवळ आमदार निधीतून ६२ लाख रुपयेच का दिले ?
९. आठवडे बाजाराचा एक कोटी रुपये निधी मुक्ताईनगरला परस्पर वळविला गेला तो निधी आजपर्यंत आणण्यात सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे तो परत आणण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले?
१०. बोदवड नगरपंचायत चा डीपीआर प्लांन अजून मंजूर का झाला नाही आपल्या कार्यकाळात त्याला मंजुरी मिळेल काय सत्ताधारी सदर डीपीआर प्लॅन मंजूरी साठी पाठपुरावा करण्यास असक्षम ठरले.
११. बोदवडला पूर्ण वेळ अधिकारी अजूनही उपलब्ध झालेला नाही त्याच प्रामुख्याने अभियंता उपलब्ध नाही अकाउंटंट उपलब्ध नाही त्यामुळे बोदवडच्या जनतेची कामे वेळेवर होत नाही पूर्ण वेळ अधिकाऱ्याची नियुक्ती न होणे हे सत्ताधाऱ्यासह लोकप्रतिनिधीचे अपयश नाही का?
१२. साधारणता सहा वर्ष अगोदर आमदार खडसे यांनी कब्रस्तानला चाळीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला सदर निधी अजूनही अखर्चित का?
१३. तात्पुरती पाईपलाईन आठ कोटी मंजूर चार महिन्यात पूर्ण करू असे निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते आज जवळपास तीन वर्षे झाली सदर तात्पुरती पाईपलाईन का आणू शकले नाही हे जाहीर करावे.
१४. मुख्य पाणीपुरवठा लाईन योजना एका वर्षात कार्यान्वित करू अशी वल्गना केली होती पूर्ण पाच वर्षे झाले अजूनही पाणीपुरवठा योजना मार्गी लागली नाही खडसे यांच्या कार्यकाळातील ३७ कोटीची योजना १०५ कोटीपर्यंत पोहोचलि कारण सत्ताधाऱ्यांनी वेळ खाऊपणा केला त्यामुळे बोदवड कर जनतेला अजूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
१५. शिवसेनेच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये माजी नगराध्यक्ष पती जाहीरपणे वक्तव्य करतात की पाणीपुरवठा योजना अजून मंजूर नाही म्हणजे पाण्याबाबतीत ते किती संवेदनशील आहे हे कळते.
१६. पाच वर्षापासून घरकुलच्या लाभार्थ्यांना शेवटचा टप्प्याचे ३०००० रुपये अजून पर्यंत मिळालेले नाही घरकुल लाभार्थी वारंवार नगरपंचायतच्या चकरा मारतात त्यांना योग्य उत्तरे दिली जात नाही शेवटचा हप्ता न टाकण्यामागे कारण काय?
१७. केवळ समाजाच्या नावाने निधीची घोषणा केल्या गेल्या अजून पर्यंत एकही समाजाचे काम सुरू का होऊ शकले नाही की हा फक्त निवडणुकीचा स्टंट आहे?
१८. तेली समाजाचा मिळालेला निधी जो आमदार खडसे यांनी दिला त्याला स्थगिती देण्याचे महापाप का केले गेले?
१९. बोदवड नगरपंचायत मध्ये लाखो रुपयांचे कामे ओव्हरलॅपिग होत असताना तक्रार करूनही सदर कामे राजरोसपणे सुरू केली त्यामागे आशीर्वाद कोणाचा?
२०. नगराध्यक्ष म्हणतात की सभेमध्ये विषय घेण्याचा माझा अधिकार आहे मग असं आहे तर ग्रामपंचायत काळातील दुकानात ताब्यात घेण्याचा विषय त्यांनी सभागृहात का मांडला सदर जागेत संबंधित व्यक्ती कित्येक वर्षापासून उदरनिर्वाह करीत आहे जर राष्ट्रवादीने सदर विषयाला विरोध केला नसता तर या दुकान नगरपंचायतने ताब्यात घेतले असते.
२१. तलाव सुशोभीकरणाच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना पंधरा दिवसात सुशोभीकरणाची वाट का लागली ?
२२. सत्ताधाऱ्यांनी व आमदार साहेबांनी पाणीपुरवठा योजना एका महिन्यात मंजूर करून आणू असे जेव्हा सांगितले तेव्हा आम्ही जर एका महिन्यात पाणीपुरवठा योजना मंजुर होत असेल तर तुम्ही जे करोडो रुपयाचे रस्त्याचे काम करत आहात ते काम पाणीपुरवठ्याच्या योजनेनंतर करा नाहीतर सदर पाणी पुरवठा योजनेला विलंब होईल असे लेखी पत्र दिले आहे त्यात चुकीचे काय. कारण रस्त्याचे काम अगोदर केले तर परत पाणीपुरवठा योजना नंतर ते काम परत करावे ला गेल त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा अपव्यय होईल.
२३. बोदवड नगरपंचायत कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचा ठराव न घेता नवीन सि.सि.टी.व्ही. कॅमेरे व एल.ई.डी. टीव्ही. लावण्यात आले. व त्यानंतर ठराव घेण्यात आला हे विषय मुख्याधिकारी यांच्या लक्षात प्रभाग ८ च्या नगरसेविकेने आणून दिले तरी कोणतीच कारवाई केली नाही यामूळे यामध्ये सत्ताधारी व मूख्याधिकारी यांचे संगनमत असल्याचे दिसून येते. कार्यालयामध्ये जर असे काम होत असेल तर शहरात किती असे काम होत असेल.
२४. दि. १० मे २०२२ ला मौजे बोदवड न.पं. हददीतील गट क्र. ४१८ पै. मध्ये संत सावता माळी बहूउददेशिय (मल्टीपर्पज) सभागृह बांधकाम करणे साठी निधि प्राप्त झाले आहे. व त्यानंत नगरपंचायत मार्फत कामाचे प्रशासकिय मान्यता पुर्ण झाल्यावर सदर टेंडर ऑनलाईन करण्यात आले व काही दिवसांनी मुख्याधिकारी यांनी कोणाच्या दबाव तंत्रामध्ये येवून ते काम अचानक रदद केले. सदर कामासाठी नगरपंचायत मार्फत तांत्रिक मंजूरी साठी ५० हजार रूपये व जाहीरात खर्च व टेंडर प्रोसेस चा खर्च वाया गेला याला कारणीभूत कोण ? गोर गरीब जनतेचा पैसा न.प. ला जमा होतो. त्याचा अपव्यय मुख्याधिकारी करत आहे.
२५. शिवस्मारकाच्या संदर्भात वेळोवेळी आमची सहकार्याची भूमिका राहिलेली आहे परंतु सत्ताधाऱ्यांना ते काम करण्यात इंटरेस्ट दिसत नाही त्यांच्याकडे बहुमत असतानाही ते कोणत्याही काम मंजूर करून पूर्ण करू शकतात केवळ राजकीय हेतूने सदर स्मारकाचं काम रखडलेले आहे.
अशा प्रकारे विरोधक नगरसेवकांनी सत्ताधारी पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांवर आरोप केले असून शहरातील राजकारण साखळी उपोषण व आरोप प्रत्यारोप करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषद यामुळे तापले असून आता विरोधकांच्या या प्रत्युत्तरादाखल नगराध्यक्ष व सर्व सत्ताधारी नगरसेवक काय खुलासे देतात की हा विषय आटोपता घेत कामांवर लक्ष देतात यावर शहरातील नागरीकांचे लक्ष लागून आहे.