जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४ ऑगस्टला मतदान तर ५ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातून २४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलै रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे १२ ते १९ जुलै या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुटीमुळे १६ व १७ जुलै रोजी नामनिर्देशनत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशन पत्रांची छाननी २० जुलै रोजी होईल. तर नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. तर मतमोजणी ५ ऑगस्ट रोजी हाेणार अाहे.