नशिराबाद (प्रतिनिधी) येथे भगवान नेमिनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नुकतीच पूजा अर्चना करण्यात आली.
८८ वर्षे सुरू असलेल्या या परंपरेला कोरोनामुळे नेमिनाथ महाराज यांची पालखी पाच पाऊले पुढे सरकवून पूर्ववत जागेवर विराजमान करण्यात आली. या ठिकाणी मंदिराचे बांधकाम सुरू असून पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी दिले. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंदभाऊ पाटील, युवा सेना शहरप्रमुख चेतन बऱ्हाटे, जैन समाज अध्यक्ष दिनेश जैन, उपाध्यक्ष मंगेश जैन, महावीर सैतवाल, योगेश पाटील, पिंटू शेठ, विकास धनगर व भक्तगण उपस्थित होते.