यावल (प्रतिनिधी) गेली 26 वर्षे यावल तालुका काँग्रेस कमिटीची धुरा यशस्वीपणे संभळणारे माजी जि.प. गटनेते प्रभाकर नारायण सोनवणे यांची पुन्हा यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षदासाठी निवड झाली आहे.
प्रभाकर सोनवणे यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा यावल रावेरचे आमदार शिरीषदादा चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार,भगतसिंग पाटील,शेखर पाटील,नितीन चौधरी,लीलाधर चौधरी,अमोल भिरुड जलील पटेल,संदीप सोनवणे, कदीर खान,अनिल जांजले, नईम शेख, मुक्तार पटेल,जावेद जनाब, तालुक्यांतील सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिंनदन केले आहे.