भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील लोण पिराचे येथील शेतकरी कुटुंबातील प्रदीप देसले यांची शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना मुंबई येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील उपस्थित होते.
प्रदीप देसले हे शिव व्याख्याते असून छत्रपती
शिवाजी महाराजांच्या चरित्रावर त्यांनी राज्यभर व्याख्याने दिलीत. देसले यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाला तरुण तडफदार प्रवक्ते मिळाल्याने पक्ष बांधणीला मदत होणार आहे. त्यांच्या नियुक्तीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.