TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

vijay waghmare by vijay waghmare
November 5, 2025
in क्रीडा, जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी – जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोवा शासनातर्फे पुरस्कृत विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दोन दशकानंतर भारतात होत आहे. ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा होईल. या जागतिक बुद्धिबळपटूंसाठी आकर्षण केंद्र असलेल्या स्पर्धेत जळगाव येथील जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांना (सामना पंच) सहाय्यक पंच म्हणून नियुक्त केले आहे. ही नियुक्ती जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) यांनी केली आहे. प्रवीण ठाकरे यांनी यापूर्वी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई व वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे. विश्वचषक स्पर्धेत असा बहुमान मिळवणारे उत्तर महाराष्ट्रातील प्रविण ठाकरे पहिलेच बुद्धिबळ पंच आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल अखिल भारतीय बुद्धिबळ संघाचे सल्लागार तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी विशेष कौतूक करून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ.परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष गिरीश चितळे, नरेंद्र फिरोदिया, विनय बेले, पी. बी. भिलारे, सचिव निरंजन गोडबोले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

दर दोन वर्षांनी होणाऱ्या या बुद्धिबळ महासंग्रामात ८० पेक्षा जास्त देशांचा सहभाग असून, २०६ खेळाडू अधिकृतरित्या खेळणार आहेत. खुल्या गटातील या स्पर्धेत बाद फेरीचा अवलंब केला जात असल्याने अतिशय उत्कंठावर्धक व रोमहर्षक सामने अनुभवण्याची संधी बुद्धिबळ प्रेमींना लाभत असते. भारताकडून डी गुकेश, प्रग्नानंदा, अर्जुन इरिगेसी, विदित गुजराथी, अरविंद चिदंबरम, दिव्या देशमुख सारखे कसलेले खेळाडू सहभागी होत असून जगभरातून अनिश गिरी, वेस्ली सो, नोदरबेक अब्दुसत्तारोव,इयान नेपोमियाशी, व्हिन्सेंट केमर, लियोन आरोनियन यांसारखे दिग्गज व अनुभवी खेळाडू देखील या स्पर्धेत आपले कसब पणाला लावतील.

READ ALSO

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

जगातील सर्वोत्तम २०६ बुद्धिबळपटू त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक व नियुक्त केलेले पंच या सर्वांची चोख व्यवस्था अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या स्पर्धा व्यवस्थापन समितीने व गोवा शासनाने केली आहे. या जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपल्या जळगाव जिल्ह्यातील व्यक्तीस हा बहुमान प्राप्त व्हावा, ही महाराष्ट्रातील बुद्धिबळ प्रेमींसाठी खचितच अभिमानास्पद बाब आहे.
या त्यांच्या यशासाठी जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, चंद्रशेखर देशमुख, पद्माकर करणकर, शकील देशपांडे, आर. के. पाटील, नरेंद्र पाटील, संजय पाटील, यशवंत देसले, तेजस तायडे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी व सहकाऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

फोटो कॅप्शन – प्रविण ठाकरे यांची विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्त झाल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना अशोक जैन, अतुल जैन.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
Next Post

फेसबुकच्या ओळखीतून सायबर ठगाने डॉक्टरला २८ लाखात गंडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आपत्तीग्रस्त गावांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : ना. गुलाबराव पाटील

July 27, 2021

शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करणार : डॉ. हर्षल माने

June 24, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 एप्रिल 2025

April 19, 2025

बीएचआर घोटाळा : विवेक ठाकरेच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचा जोरदार युक्तिवाद !

January 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group