धरणगाव (प्रतिनिधी) येथील दि. अर्बन को ऑप. बँक लि. धरणगाव या बँकेच्या चेअरमनपदी प्रविण कुडे तर, व्हा. चेअरमन अंजनीकुमार मुंदडा यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
चेअरमन व व्हा. चेअरमन निवडणुकीचा कार्यक्रम अध्यासी अधिकारी विशाल ठाकुर यांचे अध्यक्षतेखाली दि. २१ बुधवार रोजी सकाळी १०.३० वाजता बँकेच्या धरणगाव येथील मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. नामनिर्देशन पत्र स्विकृतीच्या वेळे पावेतो चेअरमन पदासाठी प्रविण कुडे व व्हा. चेअरमन पदासाठी अंजनीकुमार मुंदडा यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने प्रविण कुडे यांची चेअरमनपदी अंजनीकुमार मुंदडा यांची व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी यांनी जाहिर केले.
नवनियुक्त संचालक मंडळात सर्वसाधारण मतदार संघातून सुभाष पाटील, प्रविण कुडे, रविंद्र पाटील, अंजनीकुमार मुंदडा, संजय कोठारी, अॅड. दत्तात्रय महाजन, सचिन शहा, डॉ.स्वप्निल पाटील, सचिन बागुल, नितीन चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. महिला राखीव मतदार संघातून डॉ. मनिषा सुर्यवंशी व डॉ. अर्चना काबरा, ओबीसी मतदार संघातुन डॉ. पुष्कर महाजन, अनुसुचित जाती / जमातीमधून सचिन पानपाटील व विजाभज / विमाप्र मतदार संघातून समाधान धनगर यांची बिनविरोध निवड झाली.
सदर निवडणूक प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, धरणगाव विशाल ठाकुर व त्यांचे सहकारी हेमंत पाटील, शिंदे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. बँकेचे माजी चेअरमन हेमलालशेठ भाटीया यांच्या मार्गदर्शनाने बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे व संचालकांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.