नाशिक (प्रतिनिधी) सध्या माझ्याविरुद्ध आरोप केले जात आहे. परंतू कुणीही पुरावे देण्यास तयार नाही. त्यामुळे आमच्याकडे हे आहे… आमच्याकडे ते आहे… असे म्हणणाऱ्यांनी एकदा काय असेल ते दाखवूनच टाका, असं आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना दिले आहे. आज नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.
भाजपाचे संकटमोचक नेते आणि राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बीएचआर पतसंस्थेच्या जमिनी अतिशय कमी दरात खरेदी केल्या. आपल्याकडे पुराव्याचे सीडी आणि पेन ड्राईव्ह आहेत आणि योग्य वेळ आल्यावर उघड करू,” असा गंभीर आरोप जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केला आहे. ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला होता. गिरीश महाजन म्हणाले की, मी नेत्यांपासून ते आरोप करण्यापर्यंत सर्वांना सांगितले आहे की, आपल्याकडे पुरावे असतील ते देऊन टाका. यातच कोणी म्हणतोय आमच्याकडे हे आहे… तर कुणी म्हणते ते आहे! तुमच्याकडे काही असेल तर ते दाखवूनच टाका असे आवाहन गिरीश महाजन आणि विरोधकांना दिले आहे.