वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन एअरफोर्स विमानात चढत असताना तीन वेळा विमानाच्या शिडीवरून पायऱ्या चढताना एक किंवा दोन नाही तर तब्बल तीन वेळा त्यांचा तोल गेल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. यामुळे जो बायडेन यांच्या तब्येतीबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. बायडेन ७८ वर्षांचे आहेत.
‘एअरफोर्स वन’ची शिडी चढताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन तीन वेळा पडले. त्यांचा हा पडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एअरफोर्स वन या विशेष विमानाची शिडी चढताना तीन वेळेस पडल्यावरही बायडन यांनी स्वतःला सावरले आणि सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. जो बायडन शुक्रवारी आशियाई-अमेरिकी समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी अटलांटाच्या दौऱ्यावर निघाले होते. अटलांटा जाण्यासाठी ते ‘एअरफोर्स वन’ या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या विशेष विमानाची शिडी चढताना पायऱ्यांवरच पडले.
राष्ट्रपती जो बायडेन शुक्रवारी अॅटलांटा दौऱ्यावर निघाले होते. तिथे ते आशियाई- अमेरिकी नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. याठिकाणी जाण्यासाठी ते आपल्या एअरफोर्स वन या विमानानं रवाना होण्यासाठी पायऱ्या चढत होते. हे विमान जगातील सर्वात सुरक्षित आणि आलिशान समजलं जातं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा भारतात आले होते तेव्हा या विमानाची खासियत सगळ्यांना समजली होती. आता हेच विमान अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन वापरतात. याच विमानात चढताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला.