जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यानिमित्त उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या जळगाव, धुळे व नंदूरबार मंडलातील तंत्रज्ञ व यंत्रचालकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी समुपदेशक रागीब अहमद यांनी जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन केले. योग शिक्षक सागर साळी यांनी योगाच्या माध्यमातून तणावमुक्त कसे रहावे याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक नरेश पाटील यांनी कामगार कल्याण योजनांची माहिती दिली. मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी गुणवंत कामगारांचे कौतुक करत सकारात्मक विचारातून आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. उत्तम ग्राहकसेवा, अखंडित वीजपुरवठ्यासोबतच वीजबिल वसुलीसही प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेळकर, कार्यकारी अभियंता राजेंद्र मार्के, गोरक्षनाथ सपकाळे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर यांची उपस्थिती होती. मधुसूदन सामुद्रे यांनी सूत्रसंचालन केले.
पुरस्कारप्राप्त कर्मचारी : जळगाव मंडल – अमरजीत जोशी, दीपक पाटील, विलास पाटील, अमोल वाणी, रवींद्र पाटील, ममराज राठोड, गोपाल साटोटे, नीलेश भोसले, राजू कचरे, सतीश बऱ्हाटे, अशोक ठाकूर, नीलेश भोळे, अमोल सरोदे, गजानन साबळे, योगेश बेलदार, अभिजीत राणे, जीवन महाजन, गुरुदास पाटील, रवींद्र खलसे, संदीप माळी, संजय धनगर, श्याम लंगोटे, मनोज सूर्यवंशी, अनंत महाले, शरद सोनवणे, महावीर बुरसे, समाधान मानकर, साहेबराव पाटील, नीलेश पाटील, स्वप्नील भगत, विनोद कुंवर, प्रेमराज पाटील, मुकेश सोनवणे, समाधान पाटील, पंडित चाटे, दीपक माळी, कृणाल चौधरी. धुळे मंडळ – गिरीश घोडगे, सुनील सैंदाणे, भरत महाले, लक्ष्मण घटी, ज्ञानेश्वर सैंदाणे, स्वप्नील पाटील, धीरज पाटील, सचिन राजपूत, मनोज पाटील, प्रमोद राजपूत, नितीन महाले, सागर हरळ, पंकज अहिरे, जगदीश देसले, मोहन मराठे. नंदुरबार मंडल – सचिन वळवी, सुधाकर सागर, विलास पाडवी, राहुल साळवे, योगेंद्र महाले, अर्जुन गावित, चेतन गिरासे, सुहास आहेर, दिलीप पावरा, भाईदास पाडवी, देवराम वळवी.