नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला आहे. त्या नुसार ३० जून पर्यंत मोदींकडे १ कोटी ७५ लाख ६३ हजार ६१८ रुपये इतकी चल संपत्ती होती. त्यांच्याकडे ३० जूनला ३१ हजार ४५० रुपये रोकड होती. तर मोदींवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. तसेच त्यांच्याकडे कार देखील नाही. त्यांच्याकडे सोन्याच्या ४ अंगठ्या आहेत.
मोदींच्या बचत खात्यात ३० जूनला ३.३८ लाख रुपये होते. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गांधीनगर शाखेत फिक्स्ड डिपॉझिट केले आहे. गेल्या वर्षी त्याचे मूल्य १ कोटी २७ लाख, ८१ हजार ५७४ रुपये इतकी होती. त्यात ३० जून २०२० मध्ये वाढ होऊन ती १ कोटी ६० लाख २८ हजार ३९ इतकी झाली आहे. मोदी यांनी टॅक्स वाचवणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत. त्यांनी लाइफ इन्श्योरन्सव्यतिरिक्त नॅशनल सेव्हिग्ज सर्टिफिकेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड्समध्ये पैसा गुंतवला आहे. त्यांचा वीमा प्रीमियम देखील कमी झाला आहे. मोदी यांच्याकडे ८ लाख ४३ हजार १२४ रुपांचे नॅशनल सेव्हिग्ज सर्टिफिकेट आहेत, तर वीमा प्रीमियम १ लाख ५० हजार ९५७ रुपये इचका जातो. जानेवारी २०१२ मध्ये त्यांनी २० हजार रुपयांचा इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड खरेदी केला होता. हा अद्याप मॅच्युअर झालेला नाही. मोदींच्या नावावर गांधीनगरमध्ये एक घर आहे. या घराची किंमत १.१ कोटी रुपये इतकी आहे. या कुटुंबाचा मालकी हक्क मोदी आणि त्यांचे कुटुंबाला आहे.