बोदवड प्रतिनिधी । काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील अत्याचार पीडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यास जात असतांना उत्तर प्रदेशातील पोलिसांनी अटकाव केला आणि धक्काबुक्की करण्यात आली असून या घटनेचा बोदवड येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांतर्फे निषेध करण्यात आला आहे.
निषेधाचे निवेदन तहसीलदार हेमंत पाटील यांना देण्यात आले. निवेदनावर युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रा. हितेश पाटील, शिवसेना विधानसभा प्रमुख सुनील पाटील, काँग्रेस शहर अध्यक्ष शे.मेहबूब शे चांद, तालुका सेवादल अध्यक्ष विनोद मायकर, सुभाष देवकर, आनंदा पाटील, नीना पाटील, राष्ट्रवादीचे लालसिंग पाटील, सेनेचे योगेश पाटील, दिपक माळी व कार्यकर्ते यांचे निवेदनावर स्वाक्षरी आहेत.