भुसावळ (प्रतिनिधी) येथे त्रिपुरा या ठिकाणी मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्याप्रकरणी मुस्लीम संघटना आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करणाऱ्या त्रिपुरा सरकारचा निषेध करीत शहरात मुस्लिम बांधवांनी आर्थिक व्यापार बंद ठेवून झालेल्या घटनेबाबत निषेध नोंदविला.
त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते अमरदीप चौक व परिसर, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद व्यापारी संकुलं, भंगार बाजार परिसर, मच्छी बाजार परिसर तसेच विविध भागात मुस्लिम व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली.
त्रिपुरा सरकारचा निषेध करण्यासाठी मुस्लिम बहुल भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शहरातील मुस्लिम बहुल परिसरामध्ये सकाळपासूनच रोजच मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते अशा ठिकाणी आज मात्र त्रिपुरा सरकारचा निषेध करण्यासाठी पूर्णतहा बंद पाळण्यात आल्याचे बघावयास मिळाले आहे. यावेळी कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज असल्याचे बघायला मिळाले आहे.