बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मनूर बु।।येथील हायस्कूलचे शिक्षक अमृत खोसे आणि बोदवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बोदवड शहराध्यक्षा प्रतिभा खोसे यांचा मुलगा शुभम याने लंडन येथील ऑक्सफर्ड बुकर्स युनिव्हर्सिटीत मोटर्स स्पोर्ट इंजीनियरिंगमध्ये अव्वल स्थानात एम. एस्सी. (मेकॅनिकल इंजिनिअरिंग)चे शिक्षण पूर्ण केले आहे. या यशानंतर त्यास तात्काळ जागतिक दर्जाच्या रोल्स रॉयस या कंपनीमध्ये इंटेरियर सरफेस प्लानर या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शुभमच्या या घवघवीत यशामुळे बोदवड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
९०० वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासासह, आधुनिकतेच्या मार्गाने आपली वाटचाल करत, जागतिक शिक्षणासाठी सर्वोत्तम संस्थांपैकी एक म्हणून आपले स्थान टिकवून ठेवणारे, ऑक्सफर्ड हे एक असे विद्यापीठ आहे,की ज्याला परिचयाची गरज नाही. अग्रगण्य संशोधन आणि शिक्षणाचे ठिकाण, त्याच्या विद्यार्थी लोकसंख्येपैकी जवळजवळ एक तृतीयांश आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी बनलेले आहे.
ऑक्सफर्ड ट्यूटोरियल सिस्टम विद्यापीठातील संसाधने इतकी अफाट आहेत की, ते ऑक्सफर्ड ट्यूटोरियलसाठी प्रदान करू शकतात. ही मूलत: एक प्रणाली आहे ज्यामध्ये दोन किंवा तीन विद्यार्थी एका विषय तज्ञासोबत साधारणत: एक तास, दर आठवड्याला एकत्र बसतात आणि विषयावर चर्चा करतात. हे विद्यार्थ्याला समस्या स्पष्ट करण्यास, नवीन कल्पना एक्सप्लोर करण्यास, दृष्टीकोन प्राप्त करण्यास आणि विचार करण्यास अनुमती देते. कोणताही विद्यार्थी या सभांना तयारीशिवाय जाऊ शकत नाही. हे विचारांची समान देवाणघेवाण आहे.
विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान आणि आत्मविश्वास वाढवते. अशा जागतिक दर्जाच्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळून उच्च दर्जाची नोकरी संपादन केल्यामुळे शुभम अमृत खोसे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या शुभम लंडन जवळील चिंचेस्टर या शहरातील रोल्स रॉयल्स या कंपनीत वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. शुभमने मेकॅनिकल इंजिनियर ही पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्याने लंडन येथील ऑक्सफर्ड बुकर्स युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, विनोद तराळ तथा तालुक्यातील अनेकांनी शुभमच्या या यशाबद्दल खोसे परिवाराचे अभिनंदन केले आहे.