बोदवड (प्रतिनिधी) येथील नगरपंचायतसाठी तसेच प्रभाग क्रमांक 13 साठी आवश्यक असलेल्या विकासकामांना निधी मिळावा, यासाठी नगरसेवक हाजी सईद बागवान ,निलेश माळी,हर्षल बडगुजर,गोलू बरडीया यांनी मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निवेदन दिले.
नगरसेवक हाजी सईद बागवान ,निलेश माळी,हर्षल बडगुजर,गोलू बरडीया यांनी नुकतीच मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निवेदन दिले. निवेदनात बोदवडमधील खुल्या भूखंडावर सामाजिक सभागृह बांधकाम व वॉल कंपाऊंड करणे,रस्ते काँक्रिटीकरण,व्यायामशाळा बांधकाम वॉल कंपाऊंड व सुशोभीकरण करणे,बोदवड शहरातील मुस्लिम कब्रस्तान येथे वॉल कंपाऊंड बांधकाम व सुशोभीकरण करणे,सार्वजनिक मॉडेल शौचालय बांधकाम करणे,प्र. क्र.१३मध्ये रास्ते काँक्रिटी करणे,दोन्ही बाजू आरसीसी गटर बांधकाम करणे, म्हसोबा मंदिर समोरील सार्वजनिक मॉडेल शौचालय बांधकाम करणे,खुल्या भूखंडात ओपन जिम बांधकाम, वॉल कंपाऊंड व सुशोभीकरण करणे.या कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली.