जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर संपूर्ण भारतातील आर्बिटर यांना आपले करियर बुध्दी बळात करावयाचे असल्याने त्यांना जॉब सेक्युरिटी म्हणून अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने मासिक स्वरूपात पेन्शनची योजना आखावी व त्यांना पेन्शन देण्यात यावी, तसेच सुरक्षा कवच देण्यात यावे, अशी मागणी खजिनदार फारूक शेख यांनी राज्य पातळीवरील शिबिरात केली आहे.
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना आयोजित महाराष्ट्र राज्यातील आर्बिटरचे दुसऱ्या प्रशिक्षण शिबिराचे ऑनलाईन उद्घाटन २३ मे रविवार रोजी सकाळी नऊ वाजता अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष वीपनेश भारद्वाज, खजिनदार नरेश शर्मा, मुंबईचे राहुल शाह, महाराष्ट्र संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश चितळे व खजिनदार फारुक शेख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फारुक शेख यांनी महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर संपूर्ण भारतातील आर्बिटर यांना आपले करियर बुध्दी बळात करावयाचे असल्याने त्यांना जॉब सेक्युरिटी म्हणून अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने मासिक स्वरूपात पेन्शनची योजना आखावी व त्यांना पेन्शन देण्यात यावी अशी मागणी केली. तसेच ज्या राज्यात दोन संघटनेचा वाद असेल तेथील आर्बिटर सोबत सत्ताधारी संघटना भेदभाव करून त्यांना स्पर्धा देत नाही असा भेदभाव होता कामा नये, तसेच जिल्हा अथवा राज्य संघटनेवर आर्बिटर यांना न घेता त्यांची त्यांचे वेगळे अस्तित्व वेगळ्या संघटनेच्या स्वरुपात असावे अशी मागणी केली.
शेख यांच्या मागणीबाबत महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर व भारतीय महासंघाचे उपाध्यक्ष वीपनेश भारद्वाज, खजिनदार नरेश शर्मा यांनी चांगले सजेशन असल्याने ते विचारात घ्यावे लागेल, असे मत व्यक्त केले.
यांनी केले मार्गदर्शन
भारतीय महासंघाचे वीपनेश भारद्वाज यांनी आर्बिटर हा हार्ड वर्कर, ऑल राउंडर, स्मार्ट व कुल असावा. तर भारताचे खजिनदार नरेश शर्मा यांनी आर्बिटर हा पेशन ठेवणारा, इम पार्सल चांगले गुणासोबत, चांगल्या गणवेशात असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. गिरीश चितळे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यांनी आर्बिटर हा खेळाडू, पालक या मधील महत्त्वाचा दुवा असल्याने तो नेहमी हसतमुख असणे आवश्यक आहे. फारुख शेख यांनी आर्बिटर हा स्पर्धा आयोजक, स्पर्धेतील खेळाडू, पालक, माध्यमाच्या प्रतिनिधी व सहकारी आर्बिटर यांना घेऊन चालणारा असावा, असे मत व्यक्त केले.
ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांची विषेश उपस्थिती होती. या संपूर्ण ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटनाचे सुत्रसंचलन महाराष्ट्राचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांनी केले तर आभार सचिव निरंजन गोडबोले यांनी मानले. या शिबिरात मंगेश गंभीरे, स्वप्निल बनसोडे, भरत चौगुले, विलास म्हात्रे, यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात एकूण २५ आर्बिटरचा समावेश आहे. सदर शिबिर शनिवार व रविवार प्रत्येकी आठ तास असे सोळा तास सुरू राहणार आहे व जून च्या प्रथम आठवड्यात परीक्षा घेऊन प्रमाणपत्र व मानांकन देण्यात येणार असल्याचे फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.