TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पं. स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त “विरासत” मैफिलीत रसिक चिंब !

vijay waghmare by vijay waghmare
July 7, 2024
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पं. वसंतराव चांदोरकरांच्या २३ व्या स्मृती दिनाच्या पूर्व संध्येस म्हणजे रविवार दि. ७ जुलै २०२४ “विरासत” मैफिलीचे आयोजन केले होते. या मैफिलीस भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले होते. कांताई सभागृहात रंगलेल्या मैफिलीची सुरवात प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार दीपक चांदोरकर यांच्या गुरुवंनदनेने झाली. दीपप्रज्वलन बहिणाबाई चौधरी उमवी चे कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागाचे डिन डॉ. अनिल डोंगरे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांच्याहस्ते झाले. कलावंतांचा सत्कार उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, डॉ. अनिल डोंगरे व सचिव अरविंद देशपांडे यांनी केला.

अभिजात संगितात बखले घराण्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या स्व. पं. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृतींची आठवण केली गेली.या परंपरेतील कलाकारांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम म्हणजेच विरासत देवगंधर्व भास्करबुवा बखले हे सौ. शिल्पा पुणतांबेकर व सौ. सावनी दातार कुळकर्णी यांचे पणजोबा. त्यांनी गायलेले राग, संगीतबद्ध केलेली नाट्यपदे, अभंग, भक्तिगीते, भावगीते, गवळणी पासून ते लावणीपर्यंतचा वारसा, किंवा विरासत चा कॅनव्हॉस उलगडून दाखविला.
कार्यक्रमाची सुरुवात भूप रागातील ‘फुलवन सेज सवारू’ या बंदीशीने झाली व त्यालाच जोडून तरणा सादर केला गेला. त्यानंतर सं. स्वयंवर नाटकातील ‘ सृजन कसा मन चोरी’ हे नाट्यपद सादर केले याचे संगीत देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचे आहे. त्यानंतर छोटा गंधर्व यांनी संगीतबद्ध केलेला ‘बोलू ऎसे बोले’ हा अभंग सादर झाला. त्यानंतर पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेले व माणिक वर्मा यांनी गाऊन अजरामर केलेले भावगीत ‘हसले मनी चांदणे’ हे सादर झाले. पं. भास्करबुवांचे पट्टशिष्य संगीतकलनिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी संगीतबद्ध केलेले व जेष्ठ गायिका कै. जोत्सना भोळे यांनी गायलेले कुलवधू नाटकातील ‘ क्षण आला भाग्याचा’हे नाट्यपद सादर झाले. त्यानंतर मानापमान नाटकातील ‘ शुरा मी वंदिले’ हे पद सादर झाले. आग्रा घराण्याची सुप्रसिद्ध सोहनी रागातील बंदिश सादर झाली. बाळासाहेब माटे यांनी संगीत देऊन जोत्सना बाईनी गायलेली ‘ कुणीतरी सांगा जे’ ही गवळण सादर झाली. चित्रपट संगीतात मास्टर कृष्णा यांनी संगीत दिलेले ‘आता कशाला उद्याची बात’ हे गीत सादर झाले. यानंतर श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेला रामदास स्वामींचा ‘ताने स्वररंग व्हावा’ हा अभंग सादर झाला. विरासत कार्यक्रमाची सांगता सं. कान्होपात्रा नाटकातील ‘अगा वैकुंठीचे राया’ या अभंगाने झाली.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

शिल्पा व सावनी यांना तितकीच दमदार साथसंगत केली ती समीर पुणतांबेकर (तबला) अमेय बिच्चू (संवादिनी) डॉ. राजेंद्र दूरकर (पखावज) स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन यांच्या सहकार्याने सादर झालेली ही मैफल तमाम जळगावकर रसिकांना सुखावून गेली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: "Virasat" concert is fun!#jalgaonPt. self On the occasion of Vasantrao Chandorkar's memorial day

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ८ जुलै २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची प्रसंगीकता : प्रा. डॉ. गजानन वाकोडे

October 26, 2023

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुशताक अली पंच !

September 25, 2024

धरणगावात महिलेसह तिच्या कुटुंबियांना मारहाण ; पोलिसात गुन्हा !

June 21, 2021

खुशखबर ! मान्सून केरळमध्ये दाखल ; हवामान विभागाची माहिती

May 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group