चोपडा (प्रतिनिधी) जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर यांचे आदेशाने, तथा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग व आजारी रुग्णांची संख्या पाहता जनतेत जनजागृती करणे किती गरजेचं आहे. त्यामुळे जिल्हाभर तथा चोपडा तालुक्यातही किशोर सेंदाणे, प्रमोद पाटील, कमलेश बडगुजर यांच्यासह सर्व आरोग्य सेवा देणारे कर्मचारी वर्ग व अधिकारी या साठी पुढे सरसावले आहेत. त्या अनुषंगानेच प्रत्येक गावा-गावात जाऊन, ग्रामसभा, शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, TB विषयावर परीक्षा घेऊन, त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका भर क्षयरोग आजाराबत जनजागृती करण्याचा मानस आहे.
दि १५ ऑगष्ट २०२३ मंगळवार रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत वडगाव बु. तसेच ग्रामपंचायत सुटकार येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत, ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित उपस्थित होते. आरोग्य सेवक- विजय देशमुख, समुदाय आरोग्य अधिकारी-भुषण देशमुख, आजी-माजी ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच सदस्य, नामदेव पाटील, योगेश पाटील, कडू पाटील, वासुदेव कोळी, प्रवीण खेमणार, शिक्षक-जितेंद्र चौधरी, चंदन पाटील सर, ग्रामसेवक-के एम पाटील, जयवंत पाटील, आशा,अंगणवाडी सेविका, सर्व ग्रामस्थ, प्रतिष्टीत मान्यवर व सर्व विद्यार्थ्यांकडून, राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग आजाराबाबत व क्षयरोग आजारावरील मिळणाऱ्या मोफत औषोधोपचारा विषयी सखोल माहिती सांगून, सविस्तरपणे मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत, क्षयरोगाची जनजागृती होण्याच्या उद्देशाने, प्रशासनाने परिपत्रकातुन, दिलेली क्षयरोगाची प्रतिज्ञा, तथा शपथपत्र हे, वरील सर्व उपस्थिताकडून व विद्यार्थ्यांमार्फत आरोग्य सेवक-विजय देशमुख यांनी वदवून घेतली. शेवटी उपस्थित ग्रामस्थांचे आभार समुदाय आरोग्य अधिकारी डॉ भूषण देशमुख यांनी मानले.