धरणगांव प्रतिनिधी –धरणगांव : भारतीय संविधानाचे शिल्पकार, सत्यशोधक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सत्यशोधक समाज संघ दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन करीत अभिवादन करण्यात आले.
दिनदर्शिका प्रकाशनाला प्रमुख म्हणून माळी समाजाध्यक्ष विठोबा माळी, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, पाटील समाजाध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष महेश पाटील, तेली समाजाध्यक्ष सुनील चौधरी, श्री.दिगंबर आदिनाथ जैन समाजाध्यक्ष राहुल जैन, नाभिक समाजाध्यक्ष आनंद फुलपगार, जीवा संघटनेचे अध्यक्ष रविंद्र निकम, चर्मकार समाजाचे धर्मराज मोरे, शिंपी समाजाध्यक्ष मोहन मांडगे, बेलदार समाजाचे निजामोद्दीन शेख सर, पठाण समाजाध्यक्ष करीम खान, मातंग समाजाध्यक्ष एकनाथ चित्ते, ब्राम्हण समाजाध्यक्ष विनय भावे, बुद्धिस्ट समाजाचे दिपक वाघमारे, कैकाळी समाजाध्यक्ष बाळासाहेब जाधव, पिंजारी समाजाध्यक्ष वसीम पिंजारी, सोनार समाजाचे अमोल सोनार, परीट समाजाचे हिरामण जाधव, सय्यद समाजाचे सद्दाम सय्यद, पांचाळ समाजाध्यक्ष आकाश पांचाळ, भोई समाजाध्यक्ष सुनील जावरे, मराठे समाजाध्यक्ष भरत मराठे, वैदू समाजाचे दिपक सोनवणे, यांसह ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, प्रा.बी.एन. चौधरी, जितेंद्र महाजन,अविनाश बाविस्कर, विनोद रोकडे, राजू बाविस्कर, विकास पाटील, सतिष शिंदे, सुधाकर मोरे, राजेंद्र वाघ या सोबतच मान्यवरांमध्ये शिवसेनेचे गुलाबराव वाघ, साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे, चर्मकार संघटनेचे भानुदास विसावे, नाभिक संघटनेचे प्रा.बी एल खोंडे, शिवसेनेचे विलास महाजन, भागवत चौधरी, राष्ट्रवादीचे लक्ष्मण पाटील, कैलास पवार, अरविंद देवरे,भीमराज पाटील, महेश पवार,वाल्मीक पाटील,रामचंद्र माळी,संजय चौधरी, नंदलाल माळी,सोनू महाजन, भैय्या धनगर,राजू पाटील,मिलींद शिरसाठ,नाना शिंदे,किरण चित्ते,हरी पहिलवान आदींसह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधक समाज संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. सत्यशोधक समाज संघातर्फे प्रकाशित झालेली ही पाचवी दिनदर्शिका आहे आणि आजपासून सत्यशोधक समाज संघाची दिनदर्शिका २५ रुपयाला मिळणार आहे. सदरील दिनदर्शिकेत शिवराय,फुले, शाहू आंबेडकर तसेच सर्व महापुरुषांचे व महामातांचे जन्मोत्सव, स्मृतिदिन, कृषी संस्कृती, महाराष्ट्रातील सत्यशोधक तसेच महापुरुषांचे लेख व सत्यशोधक समाज संघाची भूमिका व कार्याची माहिती नमूद केलेली आहे. सदरील दिनदर्शिका ही वर्षातील तारखा कोष्टक स्वरूपात दाखवण्यासाठी वापरली जाते. सर्वसाधारणपणे कोणत्याही दिनदर्शिकेत तारखांबरोबर महिने, आठवड्याचे वार, विविध सुट्ट्या इत्यादी माहिती त्यात दिली आहे. याखेरीज दिनदर्शिकेच्या प्रकारानुसार त्यामध्ये अधिकची माहिती नमूद आहे म्हणून घरा-घरात प्रत्येकाने ही दिनदर्शिका घ्यावी, असे प्रतिपादन सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी.डी.पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा संघटक लक्ष्मणराव पाटील, एच.डी.माळी, लक्ष्मणराव पाटील, गोरख देशमुख, सुनिल देशमुख, प्रफुल पवार, मयूर भामरे, प्रा.आकाश बिवाल, पिंटू सपकाळे, विक्रम पाटील, डिगंबर निकम, दिपक पाटील यांनी परिश्रम घेतले.