धरणगाव (प्रतिनिधी) सत्यशोधक समाजाने सन २०२२ मध्ये १५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधुन श्री संत सावता माळी समाज सुधारणा मंडळ मोठा माळीवाडा सभागृह येथे सत्यशोधक समाज संघ निर्मित दिनदर्शिका-२०२३ चे मान्यवरांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सत्यशोधक संघाचे प्रचारक एच.डी.माळी यांनी सत्यशोधक समाज संघाच्या दिनदर्शिकेचे उद्देश व आपली संस्कृती, सण – उत्सव, बहुजन संत – महापुरुषांच्या जयंती व स्मृतिदिन, नोबेल पारितोषिक मिळविणारे सर्व मान्यवर आणि सत्यशोधक समाज संघाच्या ऐतिहासिक परिषदा व जिल्हा अधिवेशन यांची विस्तृत माहिती दिनदर्शिकेत नमूद केली आहे, असे प्रतिपादन माळी सरांनी केले. तद्नंतर सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक पी.डी.पाटील म्हणाले की, दिनदर्शिका म्हणजे महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा प्रेरक इतिहास व कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक दिपस्तंभ आहे. धर्मातील दांभिकतेवर ताशेरे ओढणारे पहिले महापुरुष, सत्यशोधक तात्यासाहेब जोतीराव फुले होते. तसेच सत्यशोधक समाज संघ दिनदर्शिकेची वैशिष्ट्ये सांगत मुखपृष्ठावर सार्वजनिक सत्यधर्माची सामूहिक प्रार्थना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असेही यावेळी श्री. पाटील म्हणाले.
दिनदर्शिका प्रकाशन सोहळा प्रसंगी माळी समाजाध्यक्ष विठोबा माळी, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, पाटील समाजाध्यक्ष भीमराज पाटील, सचिव गोपाळ पाटील, तिळवण तेली समाजाध्यक्ष सुनिल चौधरी, शिंपी समाजाध्यक्ष किरण सोनवणी, चर्मकार संघाचे भानुदास विसावे, बुद्धिष्ट समाजाचे दिपकराव वाघमारे, क्षत्रिय (खत्री) समाज सचिव राजेंद्र पडोळ, मातंग समाजाध्यक्ष एकनाथ चित्ते, मराठे समाजाचे प्रफुल पवार, यांच्यासह विशेष उपस्थिती शिवसेना नेते गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी नेते ज्ञानेश्वर महाजन, भाजपा नेते ॲड.संजय महाजन, नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते कैलास माळी, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन ॲड. व्ही.एस.भोलाणे, ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, व्याख्याते लक्ष्मणराव पाटील, विश्वस्त व्ही.टी.माळी, विजय महाजन, दशरथ बापू महाजन, रावा आप्पा, तुळशीराम भगत, गोरख देशमुख, दिनेश भदाणे, हेमंत महाजन, गोपाल अण्णा माळी, बाळू माळी, भगवान महाजन, कैलास माळी, राजेंद्र वाघ, आदी मान्यवरांच्या हस्ते उत्साहात प्रकाशन करण्यात आले. दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कार्यक्रम यशस्वितेसाठी सत्यशोधकीय कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.