मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत भाजपला डिवचले आहे. ‘राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल’, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
“राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुध्द भाजप संघर्ष टोकाला गेला आहे. गेल्या 3 दिवसांपासून राणा दाम्पत्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या विषयामुळे सर्वत्र खळबळ सुरू आहे.
मात्र पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये, यासाठी राणा दांपत्याने माघार घेतली. मात्र त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांवर हल्ले देखील झाले. यानंतर भाजपचं शिष्टमंडळ तातडीने दिल्लीला रवाना होणार आहे. त्याआधीच आव्हाड यांनी हे ट्वीट केलं आहे. त्यामुळे आव्हाडांचं हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.