जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्र कुलगुरू प्रभारी यांच्या जागेवर १३ (१०) नुसार नवीन नियुक्ती करून त्या अधिकारीकडे त्यांचा पदभार देण्यात यावा, अशी मागणी जळगाव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिव अँड. कुणाल पवार यांनी प्रभारी कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिव अँड. कुणाल बी. पवार यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रभारी कुलगुरू यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आम्ही विद्यापीठामध्ये वेळोवेळी निर्माण होणाऱ्या अडचणी मांडत असून त्यावर विद्यार्थी व कर्मचारी अधिकारी ह्यांना अडचणी वर मात करता यावी यासाठी प्रयत्नशील असतो आपल्या विद्यापीठमध्ये सध्या प्रभारी राज सुरू आहे. परंतु विद्यापीठामधील कामकाज ह्या कोरोनाच्या महामारीत देखील बंद करणे योग्य व शक्य नाही परंतु आपण पदभार घेतला. त्यानंतर विद्यापीठमध्ये एक दोन व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा उद्रेक आपल्या विद्यापीठामध्ये पहायला मिळत आहे. त्यानी फक्त पदाच्या लालसेने कोरोनाची महिती लपवून इतर लोकांचा जीव धोक्यात घातला. त्यावेळी जिल्हाधिकारी यांना आम्ही तक्रार केल्यानंतर त्याठिकाणी टेस्ट करण्यात आल्यात व बऱ्याच लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजले त्यामुळे काही कर्मचारी आपल्याला सोडून गेले. त्याला जबाबदार कोण ..कोणाच्या हट्टाला पुरवण्यासाठी हे केले जात आहे. ह्याची देखील महिती आपण द्यावी प्र कुलसचिव प्र कुलगुरू हे उपचार घेत आहेत. त्यावेळेस प्र कुलसचिव ह्यांच्या जागेवर नवीन व्यक्तीस पदभार देण्यात आला. परंतु तसच प्र कुलगुरू ह्यांच्या बाबतीत कलम १३ (१०) नुसार निर्णय का घेतला जात नाही. किवा कोणाचा दबाव येत आहे का? की आपल्याला सत्यता कळविली जात नाही. ह्याबाबतशंका निर्माण होत आहे. त्यामुळे प्र कुलगुरू प्रभारी ह्यांचे कामकाज कोण पाहत आहे. हे देखील जाहीर करावे, त्यामुळे सध्या विद्यापीठाला वाली कोण असे अनेक प्रश्न अनुउत्तरत आहेत त्यांचा खुलासा आपण १३ (१०) नुसार अश्या आजारपण अनुपस्थिती किवा इतर समस्यांमुळं ते येऊ शकत नसतील तर योग्य त्या अधिकारीकडे त्यांचा पदभार देण्यात यावा, अशी मागणी जळगाव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिव अँड. कुणाल बी. पवार, भूषण भदाने, अतुल कदमबांडे, शिवराज पाटील, अनिकेत पाटील, अक्षय वंजारी आदींनी केली आहे.