जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कासमवाडी भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन कुटूंबीयात वाद उफाळून आल्याने घामासान मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात जखमींच्या तक्रारीवरुन परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कासमवाडी येथील रहिवासी अमान अली उमर अली रंगरेज (वय-५२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेजारील रऊफ इब्राहिम रंगरेज हा घरा समोर उभा राहुन उमर यांच्या पत्नी शबाना यांच्याकडे बघून शिवीगाळ करीत होता. त्याला जाब विचारल्याने त्याने हातातील लाकडी दांड्याने मारहाण करुन उमरअली यांना जखमी केले. त्यानंतर जखमीला वाचवण्यासाठी असरद अली, पुतण्या अकसर अशांना रफीक इब्राहीम रंगरेज, रहिम रऊफ रंगरेज, रईस रऊर्फ रंगरेज अशांनी लाट्या काठ्या घेत हल्ला चढवून मारहाण केली. याप्रकरणी संशयीतांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरे तक्रारदार अब्दुल रहिम रंगरेज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील रऊफ इब्राहीम रंगरेज कोंबड्या कोंडत होते. त्यावेळी असदअली रंगरेज, अमानअली उमर अली, अफसरअली रंगरेज अशांनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याने ते घरात पळत आले. त्यांच्या पाठोपाठ लाठ्याकाठ्यांसह मारेकऱ्यांनी दार तोडून घरात शिरत हल्ला चढवला. हाणामारीत जखमी अब्दुल रहिम यांच्या तक्रारीवरुन असदअली उमर अली, अमानअली उमर अली रंगरेज, अफसरअली (रा.कासमवाडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास मिलींद सोनवणे करत आहेत.