TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व. आर.ओ. तात्या पाटील यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोबत या : करण पाटील यांचे भावनिक आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2024
in पाचोरा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा खासदार असावा, असे स्वप्न स्व. आर.ओ. तात्या पाटील यांचे होते. आता त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे, असे भावनिक आवाहन जळगाव लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी केले आहे. महविकास आघाडीचा कार्यकर्ता संवाद मेळावा मंगळवारी (दि. १६) पाचोरा येथील स्वामी लॉन्स येथे पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.

आर.ओ. तात्या पाटील यांचं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ : करण पवार !
महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पवार पुढे म्हणाले की, जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा खासदार असावा, असे स्वप्न स्व. आर.ओ. तात्या पाटील यांचे होते. आता त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे. निवडणूक म्हटलं की जो-तो ज्याच्या त्याच्या पध्दतीने लढतो. मात्र, ही निवडणूक वेगळी दिसतेय. निवडणूक जाहीर झाल्यापासून चैतन्याचे वातावरण आहे. समोरच्यांकडे काहीही उरलेले नाही. ते फक्त मोदींच्या भरवशावर असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

यांची होती उपस्थिती !
यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पवार, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब पवार, स्टार प्रचारक प्रियंका जोशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, पाचोरा तालुका शिवसेना प्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख ॲड. दिपक पाटील, अनिल सावंत, भडगाव तालुकाप्रमुख जे.के. पाटील, शहरप्रमुख शंकर मारवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष विकास पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष डॉ. अमृत पाटील, नितीन तावडे, खलील देशमुख, रणजित पाटील, हर्षल पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, आम आदमी पार्टीचे योगेश हिवरकर, अस्मिताताई पाटील, योजनाताई पाटील, रमेश बाफना, शरद पाटील, अनिल सावंत, राजेंद्र राणा, दादाभाऊ चौधरी, बंडू चौधरी, राजू काळे, पप्पुदादा राजपूत, धर्मराज राजपूत, विनोद बाविस्कर, ज्ञानेश्वर पाटील, देविदास पाटील, खंडू सोनवणे, संतोष पाटील, विकास वाघ यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

बहुजन समाजाला संपविण्याचा भाजपचा डाव : संजय सावंत
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून भाजपच्या पोटात जे आहे, ते होटावर आल्याचे दिसतेय. मराठा, बहुजन समाजाला संपविण्याचा डाव भाजपचा आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडून त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले. श्री. सावंत पुढे बोलतांना म्हणाले की, गेल्या ५ ते ६ दिवसांपासून बैठकांचा सपाटा सुरू आहे. हा सपाटा सुरू असताना एक गोष्ट लक्षात आली आहे, ती म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते नवनवीन क्लृप्त्या करीत आहेत. ५ लाखांच्या मतांनी निवडून येवू असे सांगणारे आता तीन लाख आणि आता १ लाखावर आले असल्याचेही ते म्हणाले.

हक्काचा खासदार संसदेत पाठवा : वैशालीताई सुर्यवंशी
मेळाव्यात बोलतांना शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग महाविकास आघाडीने फुंकले आहे. ही फक्त लोकसभा आणि करणदादांची नाही निवडणूक तर संविधान आणि आपल्याला वाचविण्यासाठीची निवडणूक आहे. तुम्ही, आम्ही आज निर्णय नाही घेतला तर पुढची पिढी आपल्याला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. देशात सध्या द्वेषाचे राजकारण सुरू आहे. शिक्षण, आरोग्य कोणत्याही क्षेत्रात त्यांचे काम नाही. शेतकरी असो की महिला कोणीही सुखी नाही. सध्याचे सरकार हे प्रा. लि. सरकार असून या सरकारला नाकारून आपल्या हक्काचं सरकार आणि आपल्या हक्काचा खासदार संसदेत पाठवायचा आहे, असे आवाहन वैशालीताई सुर्यवंशी यांनी उपस्थितांना केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले तर आभार नंदू सोनार यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 17 एप्रिल 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुक्यात आज आढळले १२ कोरोनाबाधित !

April 22, 2021

रुममेटची सिगारेट ओढण्याची सक्ती ; तणावातून तरुणाची आत्महत्या !

October 15, 2020

मुक्ताईनगरात भीषण अपघात ; एकापाठोपाठ वाहनांनी दिलेल्या धडकेत ५ जागीच जणांचा मृत्यू

May 13, 2022

संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

November 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group