जळगाव (प्रतिनिधी) शहरातील खेडी परिसरातील एक कॉलेज जवळ अवैधपणे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका करण्यात आली असून दोन गिऱ्हाईक आणि व्यवसाय चालविणारे दांपत्यासह एक असे एकूण ५ जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका संशयित महिलेचा समावेश आहे. याबाबत शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
खेडी परिसरातील एका कॉलेज जवळ एक महिला ही स्वतःच्या फायद्यासाठी काही महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणले असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. तशी परिसरातील नागरिकांनी तक्रार देखील केली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी दुपारी ४वाजता या ठिकाणी सापळा रचला. सुरुवातीला डमी गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकला. या कारवाईत कुंटणखाना चालणाऱ्या दांपत्यासह एक असे ३ जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर येतील तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आणि या ठिकाणी असलेले गिऱ्हाईक म्हणून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये एकूण पाच संशयित आरोपी आहेत तर तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, इंदल जाधव, पोलिस कॉन्स्टेबल विक्की इंगळे, अमोल वंजारी, अनिल कांबळे, निलेश घुगे, काजल सोनवणे यांनी कारवाई केली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.