भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वे प्रशासनाकडून विविध तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेण्यात येत असून रद्द होणार्या गाड्यांमुळे त्यामुळे ऐनवेळी प्रवाशांना प्रवास रद्द करावा लागत आहे. भोपाळ विभागातील बुधनी-बरखेरा स्थानकादरम्यान तिसरी लाईन व नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी भुसावळ विभागातून भोपाळकडे जाणार्या 11 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत शिवाय आठ गाड्यांच्या मार्गात बदल झाला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-राणी कमलापती एक्सप्रेस ही गाडी 26 ऑक्टोबरला रद्द करण्यात आली तर राणी कमलापती-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी 27 ऑक्टोंबर रोजी रद्द करण्यात आली तर हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस ही गाडी 16 ते 25 ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. जयपूर-हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी 18 ते 27 या काळात रद्द असेल तर लोकमान्य टिळक टर्मिनस-हरीद्वार एक्सप्रेस ही गाडी 16 ते 26 या काळात रद्द असेल. हरीद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी 17 ते 27 ऑक्टोंबरपर्यंत रद्द असेल तर भुसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस ही गाडी 15 ते 24 ऑक्टोंबरपर्यंत व हजरत निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस ही गाडी ि13 ते 22 ऑक्टोंबरदरम्यान रद्द करण्यात आली तसेच अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस ही गाडी15 ते 27 ऑक्टोंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. बरौनी-अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी 15 ते 27 ऑक्टोंबर या काळात रद्द करण्यात आली आहे तसेच अहमदाबाद-आसनसोल एक्स्प्रेस ही गाडी 26 ऑक्टोंबरला रद्द करण्यात आली आहे.