TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महसुल वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात जमीन महसूल आणि गौणखनिज उत्खननापासून मिळणाऱ्या महसुलाची वसुली वाढवावी. महसुल वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होईल यासाठी आतापासूनच नियोजन करावे. असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.

येथील जिल्हा नियोजन सभागृहात विभागीय आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, कैलास कडलग, राजेंद्र कचरे, लक्ष्मीकांत साताळकर, विनय गोसावी, सीमा अहिरे, रामसिंग सुलाणे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, राजेंद्र वाघ, तुकाराम हुलवळे जिल्हा सुचना अधिकारी प्रमोद बोरोले, नगरपालिका प्रशासन अधिकारी जयप्रकाश पवार यांचेसह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, जिलहाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे प्रमुख व इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते. गौण खनिजाची शास्त्रीय पध्दतीने मोजणी करून महसूल वाढीसाठी प्रयत्न करावेत. आवश्यक तेथे तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. परवानगी पेक्षा जास्त गौण खनिजाचा वापर झाला असेल, तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अधिकाधिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देत मजुरांचे स्थलांतर रोखावे. वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. या अभियानांतर्गत देशी वाणाच्या रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे. यासाठी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद यांनी एलईडी बल्ब लावणे, हरितपट्टे निर्माण करण्यावर भर देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्यात. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम वसुली, पाणीटंचाई, हद्दपार प्रकरणे आदिंचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

पुरवठा विभागाने ग्राम आणि तालुकास्तरावर समित्यांचे गठण करावे. तसेच प्रत्येक तालुक्यातून किमान आदर्श स्वस्त धान्य दुकान तयार करावे. मतदार यादीतील त्रुटींची पूर्तता करावी. अधिकाधिक मतदारांच्या छायाचित्रांचा समावेश करीत छायाचित्र ओळखपत्रांचे वितरण करावे, छायाचित्र मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे त्यांनी सांगितले. वाळू लिलावांसाठी ज्या ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मिळणे बाकी आहे त्याचा पाठपुरावा करावा. ७/१२ संगणकीकरणाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी तालुकानिहाय कॅम्प लावण्याची सुचनाही त्यांनी केली. जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, महसूल वसुलीसाठी नियोजन करण्यात आले आहे. गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पथके गठित करण्यात आले आहेत. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी निवडणूक, प्रसाद मते यांनी रोजगार हमी योजना, जिल्हा पुरवठा अधिकारी सुर्यवंशी यांनी अन्नधान्य वितरण, राजेंद्र वाघ यांनी भूसंपादनाची सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयातील शाखा प्रमुख उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

सातपुड्यातील दुर्लक्षित पाड्यांवर जागर प्रतिष्ठान कडून ५० किलो दिवाळी फराळ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंढरपूरसह परिसरातल्या ११ गावांमध्ये रात्री संचारबंदी लागू

November 21, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 फेब्रुवारी 2026 !

February 22, 2026

कर्नाटक राज्यातील लूट प्रकरणाचे यावल कनेक्शन, एक जण ताब्यात !

October 9, 2021

व्हिडीओ गेम पार्लर चालकाकडे खंडणीची मागणी ; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षासह सहा जणांविरुद्ध गुन्हा

November 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group