भुसावळ (प्रतिनिधी) ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाने 20 व 21 रोजी कसार्यात कामांसाठी ब्लॉक जाहीर केला असून धुळे-मुंबई व मुंबई -धुळे एक्सप्रेस रद्द करीत 25 गाड्यांचे मार्ग बदलले आहेत तर चार गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. एकीकडे प्रवाशांनी दिवाळी सणानिमित्त गावाला जाण्याचे नियोजन केले असतानाच अचानक प्रशासनाकडून ब्लॉक जारी करण्यात आल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दोन एक्स्प्रेस रद्द !
चार नाशिकला टर्मिनेट
रविवार, 20 रोजी 11012 धुळे-मुंबई एक्सप्रेस, 11011 मुंबई-धुळे एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे तर नागपूर येथून शनिवार, 19 रोजी सुटणारी नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस ही गाडी मुंबई ऐवजी नाशिकरोडला टर्मिनेट होईल. ही गाडी नाशिक रोड ते मुंबई दरम्यान रद्द राहील तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी रविवार, 20 रोजी मुंबई-ऐवजी नाशिक रोडवरून नियोजित वेळेत सुटेल. मुंबई ते नाशिकरोड ही गाडी रद्द असेल तर शनिवार, 19 रोजी जबलपूर-मुंबई गरीबरथ एक्स्प्रेस ही गाडी मुंबई ऐवजी मनमाडला शॉर्ट टर्मिनेट होईल तसेच मनमाड-मुंबई ही गाडी रद्द असेल तर परतीच्या प्रवासात ही गाडी मनमाड येथून नियोजित वेळेत सुटेल. ही गाडी मुंबई ते मनमाड दरम्यान रद्द असेल.
अप मार्गावर असा असेल बदल !
गाडी क्रमांक 11072 बलिया-लोकमान्य टिळक टर्मिनस 19 रोजी जळगाव, नंदुरबार, वसई रोड मार्गे वळवली जाईल तर अमृतसर-मुंबई एक्सप्रेस 19 रोजी अमृतसर येथून सुटणारी जळगाव, नंदुरबार, वसई रोड मार्गे जाईल. गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस 19 रोजी गोरखपूर येथून सुटणारी गाडी जळगाव, नंदुरबार, वसई रोड मार्गे वळवली जाईल तसेच जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस, छपरा पनवेल विशेष गाडी, हावडा मुंबई-गीतांजली एक्स्प्रेस 19 रोजी जळगाव, नंदुरबार, वसई रोड मार्गे वळवण्यात येईल तसेच गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 19 रोजी गोरखपूर येथून सुटणारी गाडी मनमाड, नगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण मार्ग लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाईल. नांदेड मुंबई तपोवन एक्स्प्रेस ही गाडी रविवार, 20 रोजी मनमाड, नगर, दौड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा, कर्जत कल्याणमार्गे मुंबईत दाखल होईल तसेच सांत्रागाची*-पुणे ही गाडी मनमाड, नगर, दौड कॉर्ड लाईन मार्गे पुण्यात पोहोचणार आहे.
पटना-वास्को दि गामा एक्स्प्रेस 19 रोजी पटना येथून सुटणारी गाडी मनमाड, नगर, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण पनवेलमार्गे जाणार आहे. नागपूर-मडगाव ही गाडी 19 रोजी नागपूरहून सुटून मनमाड, नगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण मार्ग मडगाव पोचले. काझी पेठ दादर ही गाडी 9 रोजी काझी पेठहून सुटून नांदेड, परभणी, लातूररोड, लातूर, कुर्डूवाडी, दौड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याणमार्गे दादरला पोहोचणार आहे.
शनिवारच्या वळविलेल्या गाड्या !
रेल्वेने शनिवार, 18 रोजी वळविलेल्या गाड्यांमध्ये शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी जळगाव, नंदुरबार, भेटस्तान, वसई रोड मार्ग जाईल, हावडा -मुंबई मेल ही गाडी जळगांव, नंदुरबार,वसई रोड मार्ग धावेल, बालिया -दादर विशेष गाडी बलिया येथून सुटणारी मनमाड, नगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण , मार्ग दादर येथे जाईल. रक्सोल – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी रक्सोल येथून सुटणारी गाडी मनमाड, नगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण मार्ग लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाईल.
रविवार, 20 रोजी या गाड्या वळवल्या !
मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल 20 रोजी दिवा, वसई रोड, नंदुरबार, जळगाव मार्ग फिरोजपूर येथे जाईल. लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी ही गाडी व मुंबई -हावडा दुरांतो एक्सप्रेस 20 रोजी दिवा, वसई रोड, भेटस्थान, नंदुरबार, जळगावमार्गे हावडा येथे जाईल. मुंबई-नांदेड एक्सप्रेस 21 रोजी मुंबई येथून सुटणारी गाडी कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, मनमाड मार्ग नांदेडला पोचेल. मुंबई -गोंदिया विदर्भ एक्सप्रेस ि20 रोजी मुंबई येथून सुटणारी गाडी कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, मनमाडमार्गे गोंदिया येथे जाईल. मुंबई -अमरावती एक्सप्रेस मुंबईहून सुटून कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, मनमाड मार्ग अमरावतीला जाईल. मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, मनमाडमार्गे नागपूर येथे जाईल. मुंबई-बल्लारशाह नंदीग्राम एक्सप्रेस मुंबई येथून सुटणारी कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, मनमाड मार्ग बल्लारशाह येथे जाईल. लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सोल विशेष गाडी मुंबईहून सुटणारी कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, मनमाड मार्ग रक्सोल येथे जाईल.
रविवारी या गाड्या धावणार उशिराने !
मुंबई-नांदेड एक्सप्रेस 20 रोजी नियोजित वेळेपेक्षा पाच तास उशिराने मुंबई स्थानकावरून सुटेल. मुंबई-हावडा मेल नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिराने मुंबईतून सुटेल. मुंबई-लीगमपल्ली एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा 2.30 तास उशिराने मुंबई स्थानकातून सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा 2.30 तास उशीराने लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल तर मुंबई-हावडा एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा 2.30 तास उशीराने मुंबई स्थानकातून सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा तास न तास उशिराने लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-पाटलीपुत्र एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. मुंबई-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिराने मुंबई स्थानकातून सुटेल.