भुसावळ (प्रतिनिधी) खंडवा रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंग कामासाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग तसेच खंडवा अकोला रतलाम या गेज परिवर्तनाच्या कामासाठी रेल्वेने ब्लॉक घेतला असून विविध कामे या काळात केली जाणार आहेत. ५ ते २२ जुलैदरम्यान ही कामे चालणार असल्याने या काळात ८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून ८ गाड्या उशिराने चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
या ब्लॉकमुळे ५ ते २२ जुलैदरम्यान ८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात ट्रेन क्रमांक ०१०९२ खंडवा- सनवाद मेमू, ट्रेन क्रमांक ०१०९१ सनावद – खंडवा मेमू, ट्रेन क्रमांक ०५६८५ खंडवा बीर शटल, ट्रेन क्रमांक ०५६८६ बीर खंडवा शटल, ट्रेन क्रमांक ०५६८९ खंडवा बीर शटल, ट्रेन क्रमांक ०५६९० बीर खंडवा शटल, ट्रेन क्रमांक ०५६९१ खंडवा बीर शटल, ट्रेन क्रमांक ०५६९२ बीर- खंडवा शटल या गाड्या ५ ते ७ जुलैदरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर ८ गाड्या उशिराने धावणार आहेत. यात ट्रेन क्रमांक ११०५७ मुंबई- अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस ९ रोजी २.३० तासांसाठी तर ट्रेन क्रमांक २२१७७ मुंबई- वाराणसी महानगरी एक्स्प्रेस ९ रोजी अडीस तास उशिराने धावणार आहे.
ट्रेन क्रमांक १२७२० हैदराबाद- जयपूर एक्स्प्रेस ९ रोजी २.२५ तासांसाठी तर ट्रेन क्रमांक २२५३८ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस ९ रोजी ९० मिनिट उशिराने धावणार आहे. ११ जुलै रोजी ट्रेन क्रमांक ०७६५१ जालना- छपरा विशेष एक्स्प्रेस २.४५ तासांसाठी तर ट्रेन क्रमांक ११०५७ मुंबई- अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस २.३० तासांसाठी, ट्रेन क्रमांक २२१७७ मुंबई- वाराणसी महानगरी एक्सप्रेस २ तास उशिराने धावणार आहे. ट्रेन क्रमांक १२७२० हैदराबाद- जयपूर एक्स्प्रेस ११ रोजी रोजी २.३० तासांसाठी व ट्रेन क्रमांक २२५३८ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस ९० मिनिटांसाठी उशिराने धावणार आहे.