TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विकास कामांना गती देण्यासाठी साथ द्या – रोहिणीताई खडसे !

vijay waghmare by vijay waghmare
October 11, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

सावदा (प्रतिनिधी) आताच्या सत्ताधाऱ्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. केळी पीक विमा मंजूर होवून सुद्धा मिळत नाही. सीएमव्ही रोग आल्यावर त्याच्या निर्मूलनासाठी शासन स्तरावरून कोणतेही प्रयत्न झाले नाही म्हणून आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व आणखी राहिलेले विकास कामे करण्यासाठी सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याची अपेक्षा रोहिणीताई खडसे यांनी व्यक्त केली.

माजी महसूल मंत्री विधानपरिषद सदस्य आ. एकनाथराव खडसे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत रावेर तालुक्यातील एनपूर, वाघोदा खु, वाघोदा बु, मांगलवाडी, खिर्डी खु, खिर्डी बु, पुरी, बलवाडी ,उदळी बु येथे विकास कामांचे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादी जेष्ठ नेते रविंद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, माजी सभापती निवृत्ती पाटिल, तालुका अध्यक्ष किशोर पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यामध्ये एनपूर, खिर्डी खु, पुरी येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे, वाघोदा खु ,वाघोदा बु  खिर्डी खु येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे, र खिर्डी बु , बलवाडी, मांगलवाडी, येथे पेव्हर ब्लॉक बसवणे, तर उदळी बु येथे आ एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने दिपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या 1 कोटी 13 लक्ष रुपये सीएसआर निधीअंतर्गत सभागृह बांधकाम करणे या कामांचा समावेश आहे.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

विकास कामे करण्यासाठी सर्वांनी पाठीशी उभे रहा – रोहिणीताई खडसे !

यावेळी मनोगत व्यक्त करताना रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, तुम्हा सर्वांच्या साथ आशिर्वादाने आ. एकनाथराव खडसे यांनी 30 वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केले. या काळात त्यांनी जातपात, पक्षीय मतभेद न करता मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला. त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत गावातील अंतर्गत रस्ते, गटार, सभागृह, इत्यादी मुलभूत सुविधा आणि गाव जोडणारे रस्ते आणि इतर विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मिळाला.आपला परिसर हा केळी उत्पादक भाग आहे.आ. एकनाथराव खडसे कृषी मंत्री असताना त्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पिक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी केळी उत्पादक शेतकरी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्याचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला. शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांना करपा निर्मुलन पॅकेज दिले होते. परंतु, आताच्या सत्ताधाऱ्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. मंजुर होऊन सुद्धा केळी पिक विमा मिळत नाही सीएमव्ही रोग आल्यावर त्याच्या निर्मूलनासाठी शासन स्तरावरून कोणतेही प्रयत्न झाले नाही म्हणून आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व आणखी राहिलेले विकास कामे करण्यासाठी सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याची रोहिणी खडसे यांनी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटिल यांनी मनोगत व्यक्त करताना केंद्रातील राज्यातील सत्ताधारी हे शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरले असुन भविष्यात या घटकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा मुक्ताईनगर मतदारसंघावर फडकविण्यासाठी साथ द्यावी असे आपल्या मनोगतात रविंद्रभैय्या पाटिल म्हणाले.

सत्ताधारी हे विविध योजनांची प्रलोभने दाखवत आहेत – एकनाथराव खडसे

यावेळी मार्गदर्शन करताना आ. एकनाथराव खडसे म्हणाले 30 वर्षाच्या कालखंडात मुलभूत सुविधा, रस्ते, सिंचन, आरोग्य, शिक्षण यासाठी निधी आणुन मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला कामे करत असताना कोणतेही मतभेद, अभिनवेश न बाळगता विकासाला प्राधान्य दिले म्हणूनच आपण 30 वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली हा
विकासरथ अव्यहातपणे असाच सुरू राहील. केळी, कापूस उत्पादकांचे प्रश्न असो तापी काठावरील गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न असो कि इतर प्रश्न असो विधिमंडळात मांडून ते सोडविण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तुम्ही अनमोल साथ दिली भविष्यात सुद्धा हि साथ कायम ठेवा राज्यातील सत्ताधारी हे विविध योजनांची प्रलोभने दाखवत आहेत. परंतु, आतापर्यंत त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यांना या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचे आ. एकनाथराव खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले

याप्रसंगी माजी प स सदस्य दिपक पाटिल, योगिता वानखेडे, सचिन महाले, सुनिल कोंडे, नितीन पाटिल,शशांक पाटिल, अमोल महाजन, किशोर महाजन, काशिनाथ महाजन,किरण नेमाडे,भागवत कोळी, श्रीकांत चौधरी,गणेश देवगिरीकर,रोहन च-हाटे,सलमान खान, हैदर खान, अरविंद महाजन, मोहन कचरे,पवन चौधरी,शुभम मु-हेकर,शांताराम पाटिल,सुशिल पाटिल,ललित पाटिल,अश्विनी ताई बा-हे,लोटू पाटिल, राजेंद्र चौधरी,मधुकर पाटिल,सुनिल पाटिल,उज्वल पाटिल,सुधिर पाटिल, सुनिल कोल्हे, निळकंठ बढे,मनोज भंगाळे, उल्हास भंगाळे,संतोष महाजन, अय्यास शे गयास, गजानन कांडेले, मालतीबाई तायडे, दिपक तायडे, विजय तायडे, सतिष पाटिल, प्रदिप पाटिल, अजय पाटिल, हरी पाटिल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
Next Post

खरिप 2023 ची पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २० डिसेंबर २०२२ !

December 20, 2022

देशाला मूलभूत विज्ञानातील संशोधकांची गरज : डॉ. शरद काळे !

December 19, 2023

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एका ठिकाणी दरोडा तर अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न !

February 14, 2021

रेल्वेचा पुन्हा ब्लॉक : 11 गाड्या रद्द तर आठ गाड्यांच्या मार्गात बदल !

October 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group