TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकर्‍यांचे नुकसान होऊ देणार नाही, पालकमंत्र्यांची ग्वाही ; वडली शिवारातील नुकसानग्रस्तांची प्रतापराव पाटलांनी घेतली भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  तालुक्यातील वडली शिवारात सरदार ऍग्रो कंपनीचे बियाणे आणि खते वापरलेल्या शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी थेट बांधावर जात याबाबत माहिती जाणून घेतली. त्यांनी तेथून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क करून माहिती दिल्यानंतर या प्रकरणी कार्यवाहीचे आश्‍वासन देतांनाच शेतकर्‍यांचे कोणत्याही स्वरूपात नुकसान होऊ देणार नसल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. तर राज्य शासनाने सरदार कंपनीवर तात्काळ कार्यवाही करत त्यांचा विक्रीचा परवाना रद्द केला असून शेतकर्‍यांना आता नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

सध्या जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सरदार ऍग्रो कंपनीची खते वापरणार्‍या शेतकर्‍यांना अडचणी आल्याची माहिती समोर येत आहे. यातच आज रोजी तालुकास्तरीय पीक तक्रार निवारण समितीने वडली शिवारातील सरदार ऍग्रो फर्टीलायझर्स अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी उत्पादित सिंगल सुपर फॉस्फेट खताच्या कापूस पिकावरील नुकसानी च्या अनुषंगाने प्रक्षेत्र भेट केली. या भेटीदरम्यान क्षेत्रावरील कापूस पिकाचे पाने वाकडे होणे आणि गोळा होणे तसेच पिकांची वाढ खुंटणे अशा विविध लक्षणे झाडांवर आढळून आली. याची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी थेट बांधावर जाऊन शेतकर्‍यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

READ ALSO

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

दरम्यान, या तक्रारीच्या अनुषंगाने विक्रेत्यांजवळी सिंगल सुपर फॉस्फेट या खताच्या बॅगचे चार नमुने घेण्यात आलेले असून सदर नमुने हे खत नियंत्रण प्रयोगशाळा नाशिक येथील प्रयोग शाळेत तपासणी पाठवण्यात आलेले आहेत. सदर उर्वरित मालास विक्री बंद आदेश करण्यात आलेले आहे. तसेच याभेटीदरम्यान ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकर्‍यांशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला व त्यांच्या समस्या व जाणून घेतल्या तसेच अधिकार्‍यांना त्वरित पंचनामे तयार करून शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तर प्रतापभाऊ पाटील यांनी सदर परिस्थितीत शेतकर्‍यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनामार्फत बियाणे वाटप करण्यासाठी नियोजन करण्याचे सांगितले. राज्य शासनाने सरदार ऍग्रो कंपनीवर कारवाई केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी तेलबिया संशोधन केंद्रामधील कापूस पैदासकार डॉ गिरीश चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ हेमंत बाहेती, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत, मंडळ कृषी अधिकारी मिलिंद वाल्हे, पंचायत समिती कृषी अधिकारी धीरज बढे आदी मान्यवर पंचनामा स्थळी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

दुर्दैवी घटना : गिरणा नदीच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

LIC’s Pension Scheme : एलआयसीची जबरदस्त पॉलिसी, एकदाच भरा प्रीमियम ; आयुष्यभर मिळेल पेन्शन !

December 29, 2021

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 23 डिसेंबर 2025 !

December 23, 2025

धरणगावच्या प.रा. विद्यालयात योग दिवसानिमित्त योगसाधना !

June 21, 2024

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group