जळगाव (सुरेश उज्जैनवाल) आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी विठ्ठल भक्तासाठी सुखकर आणि आनंद दायी व्हावी, विशेषत: महिला,वयस्कर आणि ज्यांना पायी वारी करणे शक्य नाही, अश्या भाविकांसाठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे या कोणताही गाजा-वाजा न करता कर्तव्य भावनेतून दर वर्षी भुसावळ ते पंढरपूर ही विशेष रेल्वे ट्रेन उपलब्ध करून देण्याचा अत्यंत स्तृत्य उपक्रम राबवित आहेत.
असंख्य विठ्ठल भक्तांना पंढरपूर च्या विठुरायाचे दर्शन घडविण्यासाठी ही खास ट्रेन बुधवारी (२८ जून) भुसावळ रेल्वे स्थानकावरून दुपारी दिड वाजता पंढरपूर कडे प्रस्थान करेल. भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री याच ट्रेनने परतीचा प्रवास होईल. या सर्व प्रवासाचा भार स्वतः श्रीमती खडसे उचलतात. जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठल भक्तासाठी संत परंपरा, धार्मिक,आध्यात्मिक एकात्मतेसाठी त्यांनी सुरू केलेला उपक्रम वारकरी संप्रदायाबद्दलची आस्था दर्शवनारी तर आहेच. पण त्याच बरोबर लोकप्रतिनिधीत्वाच्या कर्तव्याची जाणीव करून देणारी म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. असा उपक्रम आपल्या जिल्ह्यात पूर्वी कुणी राबविल्याचे ऐकिवात नाही.
समस्त मानव कल्याणाच, समता, बंधुभावाचं प्रतीक असणाऱ्या पंढरपूरच्या सावळा विठोबा बद्दलची भाविक, भक्तांची ओढ लक्षात घेत खासदार रक्षाताई यांनी विशेष रेल्वेगाडी च उपलब्ध करून संत परंपरा व विचारांना कृतीची जोड दिल्याचे यातून दिसून येते. या उपक्रमाच्या माध्यमातून असंख्य भाविकांना पंढरपूर यात्रेच्या स्वप्न पूर्तीचा आनंद घेता येत आहे . हा विचार व ही परंपरा अशीच अखंडीत सुरू राहो…ही सदिच्छा आणि शुभेच्छा…!
सुरेश उज्जैनवाल, (ज्येष्ठ पत्रकार तथा जिल्हाध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया)