TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पैशाचा पाऊस, जमिनीखालून खजिना काढण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने उकळला ७८ लाखांचा ऐवज !

पतीवर करणी केल्याचे सांगून वेगवेगळ्या ठिकाणी पूजाअर्चा, काळी जादू करण्याचीही बतावणी ; ७ जणांविरोधात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी मुंबई (वृत्तसंस्था) तंत्रमंत्र, जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडण्याचे तसेच जमिनीखालून खजिना काढण्याच्या बहाण्याने, तसेच पतीवर करणी केल्याचे सांगून त्यासाठी पूजाअर्चा, काळी जादू करण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने व त्याच्या सहकाऱ्यांनी वाशीमध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीकडून तब्बल ४२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच ३६ लाख रुपयांची रक्कम लुबाडल्याचे उघडकीस आले. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील भोंदूबाबा व त्याचे सहकारी अशा एकूण ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

पत्नीला मंतरलेले पाणी व जेवणातून काहीतरी खायला दिले !
या प्रकरणातील ६२ वर्षीय तक्रारदार पवार हे सेवानिवृत्त सरकारी अधिकारी असून, सध्या ते पत्नीसह वाशीमध्ये राहण्यास आहेत. तर त्यांची विवाहित मुलगी ही पतीसह कामोठे येथे राहण्यास आहे. पवार यांनी रत्नागिरी येथे नवीन घर घेतले असून, या घराच्या बांधकामासाठी ते गेल्या महिन्यांपासून रत्नागिरी येथे येऊन जाऊन राहत होते. या कालावधीत त्यांची पत्नी वाशी येथील घरामध्ये एकटीच राहत होती. याचाच फायदा उचलत आरोपी नीलेश हातवळणे ऊर्फ गुरुजी या भोंदूबाबाने व त्याची पत्नी अर्चना हातवळणे, सागर जेजुरकर, विजय बाबेल, नाना भाऊ, भक्ती, आणि अनुसया कांबळे या सर्वांनी देवभोळी असलेल्या पवार यांच्या पत्नीला जादुटोणा, तंत्रमंत्र व काळ्या जादूची भीती दाखवून, पूजाअर्चा करण्याच्या बहाण्याने तसेच त्यांच्या पत्नीला मंतरलेले पाणी व जेवणातून काहीतरी खायला देऊन तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले, तसेच तिच्याकडून ४२ लाख ८ हजार रुपये किमतीचे १०५.२ तोळे सोन्याचे दागिने तसेच ३६ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम वेगवेगळ्या माध्यमातून लुबाडले.

READ ALSO

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

घरामध्ये आढळले काळी बाहुली, हळद कुंकू, सुया टोचलेले लिंबू !
गेल्या महिन्यात पवार रत्नागिरी येथे असताना त्यांच्या पत्नीला अचानक ब्रेन स्ट्रोक होऊन पॅरेलिसिस झाल्याने त्यांना वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी पवार यांच्या मुलीने वाशी येथील घरी जाऊन पहाणी केली असता त्यांच्या घरामध्ये काळी बाहुली, हळद कुंकू, सुया टोचलेले लिंबू दिसून आले होते. त्यानंतर पवार यांच्या घरामध्ये पूजाअर्चा, जादुटोणा, काळी जादू करण्यात आल्याचे आढळून आले होते. त्या वेळी सदर ठिकाणी सापडलेल्या एका वहीमध्ये पवार यांच्या पत्नीने अनेक लोकांची कुंडली, मंत्र जादूटोणाबाबतची माहिती लिहून ठेवल्याचे देखील निदर्शनास आले होते.

वहीमध्ये व्यवहाराची नोंद !
पवार यांच्या पत्नीने एका वहीमध्ये मागील आठ-नऊ महिन्यांचा रोजचा दिनक्रम लिहून ठेवला असून, त्यात आरोपी नीलेश हातवळणे (गुरुजी) व त्याचे अन्य सहकारी विजूभाऊ, अनुसया, अर्चना या सर्वांनी मिळून पैशाचा पाऊस पाडण्याचे तसेच जमिनीखालून खजिना काढत असल्याचे सांगून, त्यासाठी वेगवेगळ्या पूजा कराव्या लागत असल्याचे व त्यासाठी सोने, पैसे, चांदीच्या वस्तू, कपडे द्यावे लागत असल्याचे सांगून पवार यांच्या पत्नीकडून लाखो रुपये, सोन्याचे दागिने उकळल्याचे लिहिले आहे.

७ जणांविरोधात गुन्हा दाखल !
या प्रकारानंतर पवार यांनी वाशी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने वाशी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा व त्याच्या सहकाऱ्यां विरोधात फसवणुकीसह, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ कलम ३, २ (१) नुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी पूजा करण्यास पाडले भाग !
भोंदूबाबा नीलेश हातवळणे व त्याच्या सहकाऱ्यांनी पवार यांच्या पत्नीला पूजाअर्चा करण्याच्या बहाण्याने गुजरात, अहमदाबाद, नाडोल, अशापुरा, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील संगमनेर, साकुर, सावरगाव, खंडोबा, रत्नागिरी, गुहागर, उरण, अहमदनगर व इतर भागात नेले. तसेच त्यांना वेगवेगळ्या पूजा करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून प्रत्येक वेळी त्यांनी रोख रक्कम सोने व चेकच्या माध्यमातून लाखो रुपयांचा ऐवज घेतल्याचे देखील सदर वहीमध्ये नमूद असल्याचे पवार यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
Next Post

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य, २७ नोव्हेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमच्या बंडावेळीही ‘ते’ शक्य होते, पण उद्धव ठाकरेंनी…! ; मंत्री गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल !

January 16, 2023

नाबार्डतर्फे जळगाव जिल्ह्याचा १०९५७ कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा प्रकाशित !

December 16, 2023

मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई साखर कारखान्याच्या गळीत हंगामास शुभारंभ

October 30, 2020

रविंद्र रामदास तिवाणे यांचे निधन

January 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group